Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to Start Online Fixed Deposit: जाणून घ्या, ऑनलाईन फिक्स डिपॉझीट कसे सुरू करायचे?

How to Start Online Fixed Deposit

Online Fixed Deposit: तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची इच्छा आहे. पण तुम्ही एफडी वगैरे करू शकत नाही. कारण गरजेच्या वेळी कधी ही पैसा लागला, तर त्वरित हातात मिळाला पाहिजे. अशी ही विचारसरणी असते. त्यामुळे तुम्ही पैशांची गुंतवणूक करणे टाळता. मात्र आता तुमची ही समस्या दूर होणार आहे. आता तुम्हाला 'ऑनलाईन फिक्स डिपॉझीट'देखील करता येणार आहे. हे डिपॉझिट कसे करायचे, याबाबत अधिक जाणून घेवुयात.

Online Fixed Deposit: तुम्ही आता एफडी (FD) न करतादेखील ऑनलाईन फिक्स डिपॉझीट (Online Fixed Deposit) करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एकदाच बॅंकेत जाण्याची गरज पडणार आहे. तसेच काही अडी-अडचणी आली तर तुम्ही बॅंकेत चकरा न मारता ही एफडी ऑनलाईनच मोडू शकता. यासाठी वेगळी अशी काही प्रोसेस नाही. चला, तर मग जाणून घेवुयात की, ऑनलाईन फिक्स डिपॉझीट कसे सुरू करायचे.

ऑनलाईन एफडी कशी करायची? (How to Do Online FD)

तुमचे ज्या बॅंकेत खाते आहे, त्या बॅंकेचे ‘अॅप’ (App) सर्वप्रथम मोबाईलमध्ये डाउनलोड करा. या अॅपवर लॉगिनची सर्व प्रोसेस पूर्ण करा. तुमचा मोबाईल नंबर व पॅन नंबर जोडा. तुमची सर्व वैयक्तिक माहिती अपडेट झाल्यानंतर, तुम्हाला फिक्स  डिपॉझिट ऑनलाइन पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा व किती रक्कम फिक्स  डिपॉझिट म्हणून ऑनलाइन स्वरूपात ठेवायची ते आकडे टाका. त्यानंतर किती महिने व वर्षासाठी ठेवायचे त्याची निवड करा. तसेच तुम्हाला ती रिन्यू करायची का मुदत संपल्यानंतर ही रक्कम पुन्हा खात्यात आली पाहिजे यापैकी एक पर्याय निवडा. ही प्रक्रिया झाली की, तुम्ही तुमची एफडी ऑनलाइन स्वरूपात सेव्ह करू शकता. शक्यतो, जास्त पैसे एफडी स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण यामुळे अधिकाधिक व्याज (इंटरेस्ट) प्राप्त होतो.  

 ही एफडी मोडता येते का? (Can This FD Be Broken)

हो, तुम्ही केलेले ऑनलाईन फिक्स डिपॉझीट तुम्हाला कधी ही मोडता येते. यासाठी तुम्ही ऑनलाईनच पैसे काढू शकता. त्यासाठी बॅंकेत येण्याची गरज पडत नाही. गरजेच्या वेळी या एफडीची सुविधा फायदेशीर ठरते. फक्त तुम्हाला यावर मिळणारे व्याजदर मिळत नाही. मात्र ऑफलाइन एफडी केली तर ती बॅंकेत जाऊनचे समोरासमोर व्यवहार व पावत्या करूनच मिळते. ही रक्कम ऑनलाइन मिळत नाही.

ऑफलाइन फिक्स डिपॉझीट कसे सुरू करतात? (How to Start Offline Fixed Deposit)

ही सुविधा सुरू करण्यासाठी बॅंकेत जाऊन एक फॉर्म भरून दयावा लागतो. त्यानंतर पैसे हे फिक्स डिपॉझीट म्हणून ठेवावे लागते. यासाठी तुम्हाला एक पावती दिली जाते. ते सर्टिफिकेट तुम्हाला जपूण ठेवावे लागते. त्याची मर्यादा पूर्ण झाले की, ती न मोडता ही आपोआपच रिन्यूदेखील होते. फक्त तुम्हाला बॅंकेत जाऊन एक शिक्का मारून आणावा लागतो.