Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Signature Certificate काय आहे? आयटी पोर्टलवर कशी करायची याची नोंदणी? जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Digital Signature Certificate

Image Source : https://www.freepik.com/

ऑनलाइन इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग, ई-टेंडरिंगपासून ते ईपीएफओच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनपर्यंत अनेक गोष्टींसाठी डिजिटल सर्टिफिकेट सर्टिफिकेट आवश्यक असते. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आयटी पोर्टलवर हे सर्टिफिकेट रजिस्टर करू शकता.

अनेकदा ऑनलाइन एखादा फॉर्म भरायचा असल्यास अथवा इतरांना महत्त्वाची कागदपत्रं पाठवायची असल्यास अशावेळी डिजिटल सिग्नेचरची गरज भासते. ऑनलाइन इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग, ई-टेंडरिंगपासून ते ईपीएफओच्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनपर्यंत...अनेक गोष्टींसाठी डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आवश्यक आहे. तुम्हाला डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट कसे मिळेल व आयटी पोर्टलवर कशाप्रकारे रजिस्टर करू शकता? याविषयी जाणून घेऊयात.

Digital Signature Certificate (DSC) काय आहे?

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे एकप्रकारे कागदी प्रमाणपत्राचे इलेक्ट्रॉनिक स्वरुप आहे. या सर्टिफिकेटचा वापर ऑनलाइन विशिष्ट काम करण्यासाठी, ओळखीचा पुरावा म्हणून करू शकता. हे प्रकारे ही तुमची डिजिटल स्वाक्षरी असते. 

कशासाठी होतो डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटचा वापर वापर?

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटचा वापर तुम्ही ऑनलाइन इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग, कंपनीच्या नोंदणीसाठी, ऑनलाइन टेंडरसाठी, ऑनलाइन बँकिंग, सरकारी सेवांचा लाभ घेण्यासाठी करू शकता. 

कोण जारी करते डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट?

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे कंट्रोलर ऑफ सर्टिफाइंग अथॉरिटीद्वारे जारी केले जाते. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाची अधिकृत वेबसाइट https://www.mca.gov.in/MinistryV2/certifyingauthorities.html वर याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. आयटी कायदा 2000, अंतर्गत सर्टिफाइंग अथॉरिटींना डिजिटल सिग्नेचर जारी करण्याची परवानगी दिली आहे. 

डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट हे दोन प्रकारचे असतात. क्लास-2 चा वापर व्यक्तीची ओळख व इतर माहिती व्हेरिफाय करण्यासाठी केला जातो. तर क्लास-3 चा वापर व्यक्तीला रजिस्ट्रेशन अथॉरिटीसमोर स्वतःला सादर करून ओळख पटवण्यासाठी केला जातो. डीसीए सर्वांकडेच असणे गरजेचे नाही. मात्र, आयकर कायद्याच्या कलम 44AB अंतर्गत ज्या कंपन्या, राजकीय पक्षांचे खात्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे, ज्यांचे इनकम टॅक्स रिटर्नचे ई-व्हेरिफिकेशन करायचे आहे त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे.

आयटी पोर्टलवर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटची नोंदणी कशी कराल?

  • आयटी पोर्टलवर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटची नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुमच्या यूजरनेम व पासवर्डचा वापर करून लॉग इन करा.
digital-signature.jpg
  • आता Dashboard वर क्लिक करून My Profile वर जा.
digital-signature-1.jpg
Source - https://www.incometax.gov.in/
  • त्यानंतर Register DSC वर क्लिक करा.
digital-signature-2.jpg
Source - https://www.incometax.gov.in/
  • पुढे डीएससी टोकनशी लिंक असलेला ईमेल आयडी टाकून Continue वर क्लिक करा.
digital-signature-3.jpg
Source - https://www.incometax.gov.in/
  • आता Provider आणि Certificate हा पर्याय निवडा. त्यानंतर Provider Password टाकून साइनवर क्लिक करा.
digital-signature-4.jpg
Source - https://www.incometax.gov.in/
  • या सर्व प्रोसेनंतर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट रजिस्टर झाल्याचा मेसेज स्क्रिनवर दिसेल.