सध्याच्या काळात जीवन विमा अत्यंत गरजेचा झाला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वैद्यकीय खर्चामुळे संपूर्ण कुटुंबाचा जीवन विमा असणे अत्यंत गरजेचे आहे. भारतात विमा देणाऱ्या अनेक खासगी कंपन्या उपलब्ध आहेत. परंतु, बहुतांशजण सरकारी विमा कंपनी Life Insurance Corporation ला प्राधान्य देतात. तंत्रज्ञानामुळे तुम्हाला विमा काढण्यासाठी कोणत्याही एजेंटकडे जावे लागत नाही. तुम्ही अगदी घरबसल्या सहज विमा पॉलिसी काढू शकता. याशिवाय, तुम्ही जर आधीच विमा काढलेला असल्यास त्याचे स्टेटट चेक करण्याची प्रोसेस देखील खूप सोपी आहे. यासाठी कोणतेही रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
Table of contents [Show]
पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेणे गरजेचे
वेळोवेळी विमा पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेणे गरजेचे आहे. प्रामुख्याने वर्षाला एकदा विम्याचा हफ्ता भरावा लागतो. अनेकदा ही सुविधा महिन्याला किंवा त्रैमासिक देखील असते. मात्र, विम्याचा हफ्ता भरण्याची तारीख चुकल्यास समस्या येऊ शकते. यामुळे वेळोवेळी पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेणे गरजेचे आहे.
तसेच, पॉलिसीमध्ये बदल झाला असल्यास, संबंधित कागदपत्रे हरवले असल्यास अशावेळी पॉलिसीचे स्टेट्स नियमित जाणून घेतल्यास भविष्यात समस्या निर्माण होत नाही.
एसएसएमसच्या माध्यमातून जाणून घ्या विमा पॉलिसीचे स्टेट्स
- तुम्ही एसएमएस नंबरच्या मदतीने पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 56767877 या क्रमांकावर ASKLIC<पॉलिसी नंबर>STAT मेसेज पाठवावा लागेल.
- विम्याचा हफ्ता भरण्याची तारीख जाणून घेण्यासाठी 56767877 या क्रमांकावर SMS ASKLIC <पॉलिसी नंबर> ANNPD असा मेसेज पाठवावा.
- विम्याच्या हफ्त्याची रक्कम जाणून घेण्यासाठी 56767877 या क्रमांकावर ASKLIC<पॉलिसी नंबर>AMOUNT असा मेसेज करा.
- अनेकदा पुरावा म्हणून विम्याच्या पॉलिसीचे प्रमाणपत्र मागितले जाते. या प्रमाणपत्रासाठी ASKLIC<पॉलिसी नंबर>ECDUE असा मेसेज 56767877 या क्रमांकावर पाठवा.
- विमा पॉलिसीवर बोनस देखील मिळतो. बोनसची रक्कम जाणून घेण्यासाठी 56767877 या क्रमांकावर ASKLIC<पॉलिसी नंबर>BONUS असा मेसेज पाठवू शकता.
- तुम्ही विम्याची रक्कम मिळावी यासाठी कोणाला नामांकित केले आहे हे जाणून घेण्यासाठी 56767877 या क्रमांकावर ASKLIC<पॉलिसी नंबर>NOM असा मेसेज करा.
- विमा पॉलिसीवर तुम्ही कर्ज देखील काढू शकता. या कर्जाची माहिती जाणून घेण्यासाठी 56767877 या क्रमांकावर ASKLIC<पॉलिसी नंबर>LOAN असा मेसेज करावा लागेल.
- तुम्ही रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 9222492224 क्रमांकावर ASKLIC<पॉलिसी नंबर>STAT मेसेज पाठवून देखील स्टेट्स जाणून घेऊ शकता.
कॉल सेंटरच्या मदतीने जाणून घ्या विमा पॉलिसीचे स्टेट्स
तुम्ही बीएसएनएल अथवा एमटीएनएलच्या नंबरवरून 1251 या क्रमांकावर कॉलकरून पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेऊ शकता. ही सुविधा 24X7 उपलब्ध असते. यासाठी एलआयसीने 8 प्रादेशिक झोन स्थापन केले आहेत.
वेबसाईटच्या माध्यमातून जाणून घ्या विमा पॉलिसीचे स्टेट्स
तुम्ही विमा पॉलिसीचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी एलआयसीची अधिकृत वेबसाईट licindia.in ला भेट देऊ शकता. येथे तुम्हाला Customer portal वर क्लिक करून Login Page वर जावे लागेल. मात्र, वेबसाईटच्या माध्यमातून स्टेट्स जाणून घेण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. येथे तुम्हाला पॉलिसी संदर्भातील माहिती द्यावी लागेल. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विमा पॉलिसीची संपूर्ण माहिती मिळेल.