Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

राजकीय पक्षांकडे पैसा नक्की येतो कुठून? जाणून घ्या

Political Party Assets

Image Source : https://www.pexels.com/

राजकीय पक्षांना विविध मार्गांनी पैसा मिळत असतो. प्रामुख्याने देणग्यांच्या माध्यमातून पक्षांना पैसा मिळतो. सद्यस्थितीत भारतात भाजप हा सर्वात श्रीमंत पक्ष आहे.

भारतात दरमहिन्याला कोणत्यातरी राज्यात निवडणुका पार पडतात. विधानसभा, महापालिकेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत... निवडणुकीचे चक्र सातत्याने सुरूच असते. मात्र, या निवडणुका लढविण्यासाठी प्रचंड पैसे खर्च करावा लागतो. त्यामुळे राजकीय पक्षांकडे नेमका पैसे येतो कुठून व भारतातील प्रमुख राजकीय पक्षांकडे नक्की किती संपत्ती आहे? हे जाणून घेणे गरजेचे आहे. या लेखामधून भारतातील राजकीय पक्षांकडे असलेल्या संपत्तीची आकडेवारी जाणून घेऊयात.

प्रादेशिक पक्षांमध्ये सपाची संपत्ती सर्वाधिक

समाजवादी पक्षाने (सपा) वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षातील संपत्तीची आकडेवारी जाहीर केली आहे. सर्व प्रादेशिक पक्षांमध्ये सपाची संपत्ती सर्वाधिक आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सनुसार, वर्ष 2021-22 या वर्षातील सपाची संपत्ती 568.36 कोटी रुपये असून, मागील वर्षीच्या तुलनेत यात 1.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये पक्षाची संपत्ती 561.46 कोटी रुपये होती.

वर्ष 2021-22 या आर्थिक वर्षात बीआरएसने (भारत राष्ट्र समिती) 512.24 कोटी रुपये संपत्ती घोषित केली आहे. याच आर्थिक वर्षात डीएमकेची संपत्ती 399 कोटी रुपये, बीजू जनता दलाची संपत्ती 194 कोटी रुपये, एआयएडीएमकेची संपत्ती 256.13 कोटी रुपये आणि टीडीपीची संपत्ती 133.42 कोटी रुपये आहे. 

तसेच, आम आदमी पक्षाच्या संपत्ती 71.76 टक्क्यांनी वाढ झाली असून, वर्ष 2021-22 मध्ये पक्षाकडे 37.47 कोटी रुपयांची संपत्ती आहे. 

भाजप-काँग्रेसची संपत्ती किती?

सध्या भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सच्या रिपोर्टनुसार, वर्ष 2021-22 मध्ये भाजपची संपत्ती तब्बल 6046.81 कोटी रुपये आहे. देशातील सर्व पक्षांच्या एकूण संपत्तीपैकी हा आकडा तब्बल 69 टक्के आहे. भाजप पाठोपाठ काँग्रेसची संपत्ती 691.11 कोटी रुपये आहे. वर्ष 2022-21 च्या तुलनेत संपत्ती 16.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

राजकीय पक्षांकडे पैसे नक्की येतो कुठून?

राजकीय पक्षांना वेगळ्या माध्यमातून पैसे मिळत असतात. यातील सर्वात प्रमुख माध्यम हे देणग्यांच्या स्वरुपात मिळणारे पैसे हे आहे. पक्षांना परदेशातून, कॉर्पोरेट संस्थांकडून  देणग्या मिळतात. याशिवाय, सरकारने 2018 साली इलेक्ट्रॉल बाँड पद्धत आणली. याच माध्यमातून पक्षांना सर्वाधिक पैसा मिळतो. मात्र, अनेकदा हे पैसे नक्की कोणी दिले याबाबत माहिती मिळत नाही.

इलेक्ट्रॉल बाँड व्यतिरिक्त राजकीय पक्ष हे क्राउड फंडिंग, पक्षाशी संबंधित साहित्यांची विक्री, सदस्यत्व अशा विविध मार्गांनी पैसा उभारतात.