Government Subsidy: शेतकरी जोडव्यवसाय म्हणून शेळी व मेंढीपालनची निवड करतात. त्यांना या व्यवसायात आर्थिक भरभराट व्हावी, यासाठी शासनदेखील त्यांना आर्थिकदृष्टया परिपक्व बनविण्याच प्रयत्न करतात. त्यामुळे या शेळीपालन व मेंढीपालन व्यवसायासाठी शासन शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देत आहे. या योजनेविषयी सविस्तर जाणून घेवुयात.
Table of contents [Show]
शेळी व मेंढीपालन योजनेचा हेतू (Purpose of Goat and Sheep Rearing Scheme)
शेळी, मेंढीपालन व्यवसाय हा जोडव्यवसाय न करता या व्यवसायाव्दारे एक उद्योजक घडविणे. शेळी, मेंढीपालन व्यवसायाचे शाश्वत मॉडेल तयार करणे, एकात्मिक ग्रामीण शेळी व मेंढी व्यवसायात उत्पन्न वाढविण्यासाठी वैयक्तिक उद्योजक, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी सहकारी संस्था, संयुक्त दायित्व गट तसेच कलम 8 अंतर्गत स्थापन झालेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
कसे मिळणार अनुदान (How to Get Subsidy)
या योजनेमध्ये खाली दाखविल्याप्रमाणे दोन समान हप्त्यांमध्ये प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
100 (शेळ्या किंवा मेंढ्या) + 5 (बोकड ) 10 लाख
200 (शेळ्या किंवा मेंढ्या) + 10 (बोकड) 20 लाख
300 (शेळ्या किंवा मेंढ्या) + 15 (बोकड) 30 लाख
400 (शेळ्या किंवा मेंढ्या) + 20 (बोकड) 40 लाख
500 (शेळ्या किंवा मेंढ्या) + 25 (बोकड) 50 लाख
राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर आणि बँक किंवा वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्याला मिळाल्यानंतर, शासनाव्दारे अनुदानाची 50% रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते, उर्वरित 50% अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा होते.
आवश्यक कागदपत्रे (Necessary Documents)
प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( Project Report) यामध्ये प्रकल्प किंमत, आवर्ती खर्च, उत्पन्न, नफा या बाबींचा प्रामुख्याने समावेश करणे महत्वाचे आहे.
अर्ज कसा करावा (How to Apply)
या योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता www.nlm. udyamimitra.in या पोर्टलवर online पद्धतीने अर्ज भरा. प्रथम Entrepreneur म्हणून नोंदणी करा. आपली वैयक्तिक माहिती अचूक भरावी. दुसऱ्या पानामध्ये project details यामध्ये प्रकल्पाबाबतची माहिती भरावी. यानंतर बँक खात्याची माहिती व आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज ऑनलाइन सबमिट करावा.