How do I Make Money Using a Laptop: सध्या बऱ्याच कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी गमाविण्याची भिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत कधी ही कोणाची ही नोकरी जाऊ शकते. अशा परिस्थितीत बिलकूल टेंशन घेऊ नका व घरबसल्या लॅपटॉपवरून पैसा कमविण्याचा जबरदस्त मार्ग स्वीकारा.
ब्लॉगिंग (Blogging)
ब्लॉगिंग हा लॅपटॉपद्वारे पैसे कमविण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. यशस्वी ब्लॉगर होण्यासाठी तुम्हाला चांगले लिहीता येणे आवश्यक आहे. सर्वप्रथम तुम्ही ब्लॉगसाठी तुम्हाला स्वारस्य असलेल्या विषयाची निवड करा. जसे की, फिटनेस, फायनान्स, आरोग्य व आदि विषय. यावर एखाद्या विषयांवर रोज ब्लॉग लिहा. तुमचा ब्लॉग वाचकापर्यंत पोहोचला किंवा याला ट्रॅफिक मिळाले तर पैसे कमविण्याचा मार्ग तयार होतो.
आभासी सहाय्यक व्हा (Become a Virtual Assistant)
आभासी सहाय्यक त्यांच्या लॅपटॉप किंवा संगणकावर घरबसल्या काम करून चांगले पैसे कमवू शकतात. व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून, तुम्हाला ईमेल पाठवणे आणि त्यांना प्रतिसाद देणे, सोशल मीडियावर पोस्ट करणे, वेबसाइट सामग्री अपडेट करणे आणि बरेच काही करण्याचे काम दिले जाईल. हे एक सोपे फ्रीलान्सीगचे काम आहे. जे नवशिक्यांसाठी योग्य आहे. व्हर्च्युअल असिस्टंट म्हणून काम करण्यासाठी तुम्हाला फ्रीलान्स साइट्सवर व्हर्च्युअल असिस्टंटसाठी नोकरी शोधावी लागेल.
Youtube वर चॅनल बनवा (Create a channel on Youtube)
सध्या बरेच लोक युटयूब चॅनल बनून लाखो रूपये कमवित असल्याचे, आपण पाहत आहोत. तसेच खूपसारे युटयूबर्सदेखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे YouTube चॅनल सुरू करणे हा लॅपटॉपवरून ऑनलाइन पैसे कमविण्याचा एक चांगला मार्ग उपलब्ध आहे. तुम्ही युटयुबवर वैयक्तिक वित्त, फॅशन आणि तंत्रज्ञान यांसारखे तुम्हाला आवडणाऱ्या विषयांवर व्हिडीओ तयार करू शकता. एखादया व्हिडीओला चांगले व्हूज मिळाले की तुम्हाला चांगली रक्कम प्राप्त होते तसेच युटयुबवर झळकणाऱ्या जाहिरातीच्या माध्यमातूनदेखील पैसा मिळवू शकता. फक्त यासाठी कष्ट करण्याची जिद्द असावी लागेल.