बेटी बचाओ बेटी पढाओ (मुलगी वाचवा, मुलगी शिकवा) या योजनेद्वारे फक्त स्त्रीभ्रूणहत्येवर प्रतिबंध लावणे हाच निव्वळ हेतू नाही. तर मुलींचे रक्षण आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करणे, हा देखील आहे. आजकाल विनयभंग, बलात्कार, मुलींवरील कौटुंबिक हिंसाचार यांसारख्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ते थांबवण्यासाठी सरकारमार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामुळे गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
Table of contents [Show]
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, योजनेमागील उद्देश!
- मुलींना समाजात योग्य स्थान देणे
- मुलींची सुरक्षितता सुनिश्चित करणे
- स्त्री भ्रूणहत्या थांबवणे
- मुलींना चांगले शिक्षण देणे
Beti Bachao, Beti Padhao योजनेची वैशिष्ट्ये
Beti Bachao Beti Padhao, योजनेनुसार बॅंकेत खाते उघडल्यावर मुलींना बचतीवर जास्त व्याज मिळते. या खात्याची मॅच्युरिटी 21 वर्षे आहे आणि ते उघडल्याच्या दिवसापासून आणि मुलीचे वय 18 वर्षे झाल्यानंतरच ती उच्च शिक्षणासाठी अर्धी रक्कम काढू शकते. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात सर्वात लहान बचतीवर जास्तीत जास्त व्याज मिळते. तसेच, त्या मुलीचे खाते आयकर कायदा, 1961 च्या U/S 80C नुसार पूर्णपणे करमुक्त (Tax Free) आहे.
Beti Bachao, Beti Padhao योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
- बेटी बचाओ, बेटी पढाओ योजनेत तुम्हाला तुमच्या मुलीसाठी बँक खाते उघडावे लागेल, ज्यामध्ये त्या मुलीची वयोमर्यादा 10 वर्षे आहे.
- बेटी बचाओ, बेटी पढाओ योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी सर्व बॅंकांना परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जवळच्या कोणत्याही बँकेत या योजनेचे खाते उघडू शकता.
- अगदी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्येही खाते उघडू शकता.
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा योजनेचे फायदे
- ही योजना मुलींना आर्थिक मदत पुरवते
- ही योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी देते
- या योजनेत मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाते
- स्त्री भ्रूणहत्या रोखण्यास मदत करते
- मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते
- बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेचा परिणाम काय?
- या योजनेचा थेट परिणाम स्त्री भ्रूणहत्या आणि भ्रूणहत्या रोखण्यावर झाला.
- या योजनेमुळे लिंग गुणोत्तर कमी होण्यास मदत झाली.
- स्त्री भ्रूणहत्या आणि मुलगा-मुलगी यांच्यातील वाढता भेदभाव कमी झाला.