Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

HDFC Credit Card: बेस्ट रिवॉर्ड देणारं क्रेडिट कार्ड शोधताय? एचडीएफसी मनी बॅक कार्डचे फायदे पाहा

HDFC money back credit card

Image Source : www.hdfcbank.com

सध्या ऑनलाइन शॉपिंग सर्रास केली जाते. एचडीएफसी मनी बॅक क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाइन शॉपिंग केली तर जास्त रिवॉर्ड पॉइंट मिळतील. या रिवॉर्ड पॉइंटद्वारे मग तुम्हाला आणखी शॉपिंग करता येईल. या क्रेडिट कार्डचे फायदे आणि रिवॉर्डबद्दल सर्वकाही जाणून घ्या.

HDFC Credit Card: कपडे, अॅक्सेसरीज, इलेक्ट्रॉनिक वस्तुंची शॉपिंग, किराणा, घरभाड्यासह इतरही अनेक छोटे-मोठे पेमेंट करण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर वाढत आहे. अनेक बँकांचे क्रेडिट कार्ड बाजारात आहेत. मात्र, ज्या कार्डमधून सर्वाधिक बेनिफिट्स मिळतील, असे कार्ड निवडा. या लेखात एचडीएफसी मनी बँक कार्डद्वारे खरेदी केल्यास काय बेनिफिट्स मिळतील ते पाहूया.

खासगी क्षेत्रातील एचडीएफसी ही आघाडीची बँक आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार अनेक क्रेडिट कार्ड बँकेकडून ऑफर करण्यात येतात. Money back credit card हे सर्वाधिक बेनिफिट्स देणाऱ्या क्रेडिट कार्डपैकी एक आहे.  

कार्डद्वारे शॉपिंग केल्यास काय फायदे मिळतील?

प्रत्येकवेळी दीडशे रुपये खर्च केल्यास 2 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. (यामध्ये इंधन भरणे, वॉलेट रिचार्ड, व्हाऊचर द्वारे खरेदीचा समावेश नाही.)

ऑनलाइन खरेदी केल्यास दुप्पट (2x) रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. म्हणजेच जर तुम्ही दीडशे रुपये ऑनलाइन पेमेंट केले तर तुम्हाला 4 रिवॉर्ड पॉइंट्स मिळतील. 

दर तीन महिन्यांमध्ये जर तुम्ही 50 हजार रुपयांपेक्षा जास्त शॉपिंग क्रेडिट कार्डद्वारे केली तर 500 रुपयांचे गिफ्ट व्हॉउचर मिळेल. म्हणजेच वर्षातून चार वेळा 2 हजार रुपयांचे व्हॉउचर मिळू शकते. 

15 जुलै 2020 पासून ऑनलाइन खरेदीवर प्रत्येक बिलिंग सायकलमध्ये 500 पर्यंत रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. 

नोट - 1 जानेवारी 2023 पासून घरभाडे आणि सरकारी कामांसाठीच्या बिल पेमेंट्सवर रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत. तसेच किराणा मालाच्या खरेदीवर प्रति महिना 1 हजार रिवॉर्ड पॉइंट मिळतील, अशी मर्यादा घालण्यात आली आहे. 

इतर बेनिफिट कोणते?

जर क्रेडिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यावर 24 तासाच्या आत बँकेला सूचना दिल्यास फसवणुकीच्या व्यवहारांसाठी तुम्हाला पेमेंट करावे लागणार नाही. म्हणजे अशा व्यवहारांसाठी ग्राहक जबाबदार राहणार नाही.  

50 दिवसांचा व्याजदर रहित कालावधी मिळेल. जी काही खरेदी कराल त्याचे पेमेंट 50 दिवसांनी करावे लागेल. अल्प व्याजदरात संपूर्ण क्रेडिट लिमिट (रिव्हॉलविंग क्रेडिट) वापरता येईल. 

स्वीगी नेटवर्क हॉटेलमधील जेवणाच्या (डाइन आऊट) बिलावर 20% पर्यंत डिस्काउंट मिळेल. स्वीगी अॅपद्वारे केलेले पेमेंट ग्राह्य असतील. 

गाडीत इंधन भरताना इंधनावरील 1% सरचार्ज माफ होईल. कमीत कमी 400 ते 5000 हजार रुपयांचे इंधन भरल्यास 250 रुपये कमी होतील. म्हणजेच एका बिलिंग सायकलमध्ये 250 रुपये इंधन बिलावर सूट मिळवता येईल.   

कार्ड मिळण्यासाठी पात्रता काय?

ग्राहकाचे वय कमीत कमी 21 आणि 60 च्या दरम्यान असावे. मासिक उत्पन्न 25 हजार रुपये. सेल्फ एम्पलॉइड असेल तर वयाची अट 65 पर्यंत आहे. तर ITR नुसार वार्षिक उत्पन्न 6 लाखांपेक्षा जास्त हवे. 

कार्डसाठी शुल्क किती?

कार्डची जॉइनिंग/रिन्युअल शुल्क 500+ Taxes आहे. या कार्डचे बेनिफिट्स, शुल्क आणि पात्रता या लिंकवर सविस्तर पाहता येतील. तसेच कार्डसाठी अप्लाय करता येईल.