Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Government Bonds: सरकारी बाँड म्हणजे काय? यात गुंतवणूक किती फायद्याची? जाणून घ्या

Government Bonds

Image Source : https://www.moneyseth.com/

सरकारी बाँड्समधील गुंतवणूक देखील सध्या लोकप्रिय होत आहे. इतर गुंतवणुकीच्या तुलनेत यातून जास्त परतावा मिळतो.

भारतात कोणत्याही ‘सरकारी’ गोष्टीला विशेष महत्त्व दिले जाते. गुंतवणूक देखील यापासून लांब नाही. त्यामुळेच अनेकजण खासगी बँकांच्या तुलनेत सरकारी बँका व पोस्ट-ऑफिस योजना यामध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देतात. यामागचे प्रमुख कारण म्हणजे सरकारी बँकांमध्ये ठेवलेली रक्कम सुरक्षित असल्याची मान्यता. अशाच प्रकारे सरकारी बाँड्समधील गुंतवणूक देखील सध्या लोकप्रिय होत आहे. मात्र, यात प्रामुख्याने व्यावसायिक बँका, म्युच्युअल फंड, विमा कंपन्यांची मक्तेदारी पाहायला मिळते. सरकारी बाँड म्हणजे नक्की काय? यातील गुंतवणुकीचे फायदे काय? हे या लेखातून जाणून घेऊया.

सरकारी बाँड्स म्हणजे काय?

बाँडला तुम्ही एकप्रकारे कर्ज निर्माण करणारे साधन म्हणू शकता. सरकारला विविध योजना, विकास कामे राबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची गरज असते. अशावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेद्वारे बाँड्स जारी केले जातात. गुंतवणूकदार ठराविक कालावधीसाठी या बाँड्समध्ये गुंतवणूक करून सरकारला कर्ज देत असतात. या गुंतवणुकीवर गुंतवणुकदाराला व्याज दिले जाते.

एकप्रकारे हा सरकार आणि गुंतवणुकदारांमधील कर्जाच्या संदर्भातील एक दीर्घकालिन करार असतो. यात कर्जदार सरकार असते. सरकारचा सहभाग असल्याने गुंतवणुकदाराला त्याच्या गुंतवणुकीची सुरक्षितता देखील असते. बाँड्सचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुंतवणुकदाराला मूळ रक्कम व त्यावरील व्याज परत दिले जाते.

सरकारी बाँड्सचे प्रमुख प्रकार

ट्रेजरी बिल – ट्रेजरी बिल हे मनी मार्केटचा एक भाग असून, अल्पकालीन कर्जाचे साधन म्हणून सरकारद्वारे जारे केले जाते. याचा कालावधी 91 दिवस, 182 दिवस आणि 364 दिवस असतो. यावर कोणतेही व्याज दिले जात नाही. मात्र, जारी करताना याच्या मूळ रक्कमेवर सूट मिळते.

कॅश मॅनेजमेंट बिल्स (CMBs)हा काहीसा ट्रेजरी बिल सारखाच प्रकार असला तरीही याचा कालावधी हा 91 दिवसांपेक्षा कमी असतो.
ठराविक कालावधीचे सरकारी सिक्युरिटीजया सरकारी सिक्युरिटीजचा कालावधी हा 5 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असतो. यावर दर सहामाही निश्चित किंवा फ्लोटिंग व्याज दिले जाते.
सार्वभौम सूवर्ण रोखे (Sovereign Gold Bond)भौतिक सोन्याऐवजी तुम्ही बाँडच्या माध्यमातून देखील सोने खरेदी खरेदी करू शकता. या गोल्ड बाँडची किंमत ही कमोडिटी मार्केटवरून निर्धारित होते. तुम्ही 1 ग्रॅमपासून ते 20 किलोपर्यंत सोने खरेदी करू शकता.
इतर बाँड्ससरकारद्वारे फिक्स्ड रेट बाँड्स, फ्लोटिंग रेट्स बाँड, कॅपिटल इंडेक्स बाँड्स, इनफ्लेशन इंडेक्स बाँड्स, बाँड्स विथ कॉल/पूट्स ऑप्शन आणि स्पेशल सिक्युरिटीज देखील जारी केले जाते. या बाँड्सचा कालावधी आणि यावर मिळणारे व्याज हे वेगवेगळे असते.

सरकारी बाँड्समध्ये गुंतवणुकीचे फायदे काय?

  1. सरकारी बाँड्समध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे याची सुरक्षितता. यात केलेली गुंतवणूक ही कमी जोखमीची समजली जाते.
  2. गुंतवणुकदाराला त्यांच्या भांडवलावर सुरक्षितता तर मिळतेच, सोबतच  परतावा देण्याची हमी देखील सरकार देते. बँकेतील फिक्स्ड डिपॉजिटच्या तुलनेत यावर मिळणारे व्याज हे जास्त असते.
  3. तुम्ही तुमच्या सोयीनुसार 91 दिवसांपासून ते 40 वर्षांपर्यंत यात गुंतवणूक करू शकता.
  4. तुम्ही गरज भासल्यास याची सहज विक्री करू शकता. याशिवाय, पैशांची गरज असल्यास तुम्ही रेपो मार्केटमध्ये बाँड तारण ठेवून भांडवल उभारू शकता.
  5. कोणीही बँक, पोस्ट ऑफिस, ब्रोक्रेज फर्म आणि आरबीआयच्या रिटेल डायरेट प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सरकारी रोख्यांची खरेदी करू शकते.