Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Bajaj DBS Credit Card: बजाज फायनान्स डीबीएस बँक क्रेडिट कार्ड; ऑफर्स आणि कॅशबॅक प्रत्येक खरेदीवर

Bajaj DBS Credit Card

Image Source : www.bajajfinserv.in

बजाज फायनान्स आणि डीबीएस बँकेने मिळून ग्राहकासांठी खास क्रेडिट कार्ड आणले आहे. सर्वप्रकारच्या शॉपिंग, तिकीट बुकिंग, रिचार्ज, इंधन, EMI वरील खरेदीवर डिस्काउंट आणि कॅशबॅक पॉइंट मिळवता येतील. या कार्डचे काय फायदे आहेत पाहा.

Bajaj DBS Credit Card: बजाज फायनान्स आणि डीबीएस बँकेने ग्राहकांसाठी खास क्रेडिट कार्ड आणले आहे. या कार्डवर इतर कार्डपेक्षा अधिक आकर्षक ऑफर्स आणि बेनिफिट देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या कार्डद्वारे एटीएममधून शून्य टक्के दराने पैसे काढू शकता. सोबतच रिवॉर्ड पॉइंट, कॅशबॅक आणि ऑनलाइन शॉपिंगवर डिस्काउंट मिळेल. 

एका वर्षात 75 हजार रुपये कार्डद्वारे खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ होईल. प्रत्येक वेळी 200 रुपये खर्च केल्यास 2 कॅश पॉइंट मिळतील. झोमॅटो, हॉट्स्टार, प्राइम व्हिडिओच्या सबस्क्रिप्शनवर ऑफर मिळेल. 20 हजारापर्यंत वेलकम कॅशपॉइंट्स मिळतील. 

डाउनपेमेंट खरेदीवर कॅशबॅक

या क्रेडिट कार्डवर 5X पर्यंत रिवॉर्ड पॉइंट मिळू शकतात. तसेच पहिल्या वर्षी कार्डवर कोणतेही शुल्क लागू होणार नाही. (Bajaj DBS Credit Card benefit) किराणा, इ-कॉमर्स, ओटीटी, मोबाइल रिचार्ज, मूव्ही तिकीट आणि इंधन भरतानाही ऑफर्स मिळतील. बजाज नेटवर्क शॉपमध्ये EMI वर शॉपिंग करताना डाउनपेमेंटवर 5% कॅशबॅक मिळेल. 

ओटीटी रिचार्जवर कॅशपॉईंट 

किराणा, कपडे, घरगुती उपकरणांसह इतर वस्तुंची दरमहा 10 हजार रुपये शॉपिंग केल्यास 5X रिवॉर्ड पॉइंट मिळतील. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या रिचार्जवर 20% डिस्काउंट 2000 हजार कॅश पॉइंटच्या स्वरुपात मिळवता येतील. तीन महिन्यातून एकदा असे वर्षातून चारवेळा देशांतर्गत विमानतळावरील लाउंज अॅक्सेस मिळेल. 

हेल्थ बेनिफिट

या कार्डधारकांना बजाज हेल्थ बेनिफिट मिळतील. महिन्यातून तीन वेळा डॉक्टरांसोबत टेलिफोनिक कन्सल्टेशन 75 रुपयांत (प्रती कन्सल्टेशन) मिळेल. बजाज नेटवर्क हॉस्पिटलमध्ये बिलवर 20% पर्यंत डिस्काउंट मिळेल. तसेच गाडीत इंधन भरताना इंधनावरील सरचार्ज माफ बिलातून माफ होईल. 50 दिवसांपर्यंत विना व्याज एटीएममधून कॅश काढू शकता. वार्षिक शुल्क आणि इतर नियम अटी या लिंकवर वाचा.