Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

WhatsApp New Feature: जाणून घ्या, व्हॉट्सअ‍ॅपचे नवीन फीचर ‘अवतार’ बाबत

WhatsApp New Feature

Image Source : http://www.techtudo.com.br/

Avtar Feature: व्हॉट्सअॅप युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आपले व्हॉट्सअॅप चॅट अधिक मजेदार होण्यासाठी कंपनी ‘अवतार’ (Avtar) हे नवीन फीचर आणण्याच्या तयारीत आहेत. फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामवर (Instagram) उपलब्ध असलेले हे फिचर आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅपवरही पाहायला मिळणार आहे. या फीचरविषयी अधिक जाणून घेऊयात.

WhatsApp Avtar Feature: मेटाने (Meta)  WhatsApp साठी ही हे फीचर लॉन्च करणार आहे. हे फीचर सध्या फेसबुक व इंस्टाग्राम या दोन्ही ठिकाणी युजर्स वापरताना दिसतात. आता हे मजेदार फीचर व्हॉट्सअ‍ॅपवर पण येणार असल्याने युजर्सला चॅट करायला मजा येणार आहे. चला, तर मग जाणून घेऊयात या फीचर्सविषयी अधिक माहिती...  

अवतार फीचर विषयी (About Avatar Feature)

व्हॉट्सअॅपच्या ‘अवतार’ या नवीन फीचरमुळे अॅप वापरण्याची मजा आणखी वाढणार आहे. नवीन फीचरच्या मदतीने अवतार या नावाप्रमाणेच तुम्ही तुमचा अवतार सहज तयार करू शकता. तसेच तुम्ही व्हॉट्सअॅप प्रोफाइल फोटोवर (WhatsApp DP) देखील अवतार स्वरूपात फोटो लावू शकता. एवढेच नाही तर यूजर्स हा अवतार व्हॉट्सअॅप प्रोफाइल फोटोसह चॅटिंगमध्ये चॅट स्टिकर म्हणून ही वापरू शकतात. म्हणजेच चॅटिंगदरम्यान तुम्ही तुमचा अवतार स्टिकरमध्ये बदलून पाठवू शकता.

असे करेल काम (Avatar work)

तुम्ही WhatsApp वर तुमचा अवतार दोन प्रकारे तयार करू शकता. अवतार तयार करण्यासाठी, तुम्हाला व्हॉट्सअॅपमध्येच विविध केशरचना, रंग, आउटफिट्स आणि चेहऱ्यावरील हावभावचा पर्याय पाहायला मिळेल. या पर्यायांचा वापर करून तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अवतार डिझाइन करू शकता. त्यात तुम्हाला बॉडी शेप आणि चष्मा बसवण्याची सुविधादेखील आहे. तसेच तुमच्यासाठी 36 कस्टम अवतार स्टिकरचे पर्यायदेखील उपलब्ध आहे. अवतार तयार केल्यानंतर, तुम्ही तो प्रोफाइल फोटो किंवा स्टिकर म्हणून वापरू शकता. तुम्हाला तुमचा अवतार आवडत नसेल तर तुम्ही त्यात बदल ही करू शकता.

फेसबुकवर हे फिचर आधीच उपलब्ध (Avtar already Available on Facebook)

फेसबुकवर अवतार हे फीचर पहिल्यापासूनच कार्यरत आहे. मेटाच्या मालकीचे दुसरे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या व्हॉट्सअॅपवरदेखील ते वापरायला मिळणार आहे. त्यामुळे आता व्हॉट्सअॅप युजर्सला चॅटिग करण्यात आणखी मजा येणार आहे. लॉन्च दरम्यान झुकरबर्गने यांनी सांगितले की, आम्ही व्हॉट्सअॅपवर ‘अवतार’ फीचर देखील आणत आहोत, ज्याचा वापर तुम्ही प्रोफाईलवर व चॅटदरम्यान स्टिकर म्हणून ही करू शकता.