Eco Electric Bicycle: आज-काल इलेक्ट्रिक गाडया घेण्याचे प्रमाण वाढले आहे. मग यामध्ये सायकल तरी कशी मागे राहील. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन अमेरिकेच्या फायरफॉक्सने कंपनीने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे. या सायकलचे नाव ‘फायरफॉक्स अर्बन इको बायसाइकिल’ (Firefox Urban Eco Bicycle) असे आहे. या सायकलविषयी अधिक जाणून घेवुयात.
सायकलचे फीचर्स (Bicycle features)
ही इलेक्ट्रिक सायकल जर्मन तंत्रज्ञानावर आधारित असून, या सायकलची डिझाइन एचएनएफ (HNF) यांनी केले आहे. थ्राॅटलव्दारे ही सायकल ताशी 25 किमी वेगाने चालवू शकता. 10Ah क्षमतेचा बॅटरी पॅक असून 90 किमीची पेडल असिस्ट रेंज देण्यास जबरदस्त. यामध्ये पाच पेडल असिस्ट मोडचा समावेश आहे. तसेच फ्लॅट हॅंडलबार, एर्गोनाॅमिक ग्रिप्स व दोन्ही टोकांना डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत. सोबतच यामध्ये सिंगल पावर बटण आहे. ही सायकल चार्ज होण्यासाठी संपूर्ण पाच तास लागतात. विशेष म्हणजे ही सायकल अॅपद्वारे नियंत्रित करता येणार आहे.
किंमत (Price)
फायरफॉक्स अर्बन इको बायसाइकिल (Firefox Urban Eco Bicycle) या कंपनीची ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक सायकल आहे. या सायकलची किंमत साधारण 74999 रूपये इतकी आहे. फक्त ग्रे रंगात ही सायकल उपलब्ध आहे. तुम्हाला ही सायकल खरेदी करायची असेल, तर तुम्ही फायरफॉक्सच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या किंवा पेटीएमव्दारे ही बुक करू शकता.
सीईओची प्रतिक्रिया (CEO's Feedback)
ही इलेक्ट्रिक सायकल असल्याने पर्यावरणाला काही हानी पोहचणार नाही. पर्यावरणासाठी ही सायकल अत्यंत फायदेशीर आहे. तसेच पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता, भविष्यात या सायकलचा नक्कीच फायदा होईल. यापूर्वी आम्ही ही सायकल युरोपमध्ये लाँच केली आहे. तिथे आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला असून भारतात ही हे यश मिळेल अशी भावना फायरफॉक्सचे सीईओ श्रीराम सुंदरसन यांनी व्यक्त केली.