Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Accident Cover: नोकरदारांसाठी व्यक्तिगत अपघाती विमा पॉलिसी आहे आवश्यक कारण...

Personal Accident Cover

Personal Accident Cover: दरवर्षी रस्ते अपघातात काही हजारो नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातात काहींना कायमचे अपंगत्व येते. अशा वेळी व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी असल्यास संबधित अपघातग्रस्त व्यक्तीला नुकसान भरपाई मिळते. नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांनी पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी काढावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

शहरीकरण झपाट्याने होत असताना अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. त्यामुळे आयुर्विमा पॉलिसीबरोबरच प्रत्येकासाठी व्यक्तिगत विमा पॉलिसी (Personal Accident Cover) गरजेची बनली आहे. अपघात कधी केव्हा होईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे अशा संकटकाळात अपघातात आर्थिक सुरक्षा देणारे विमा कवच फायदेशीर ठरते. अपघात विमा पॉलिसी असल्यास अपघातग्रस्त व्यक्तीला नुकसान भरपाई मिळते. व्यक्तिगत अपघात विमा पॉलिसी ही अपघातामुळे पॉलिसीधारकाला होणारी नुकसान भरपाई देते. अपघातात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना विमा भरपाई मिळते. अपंगत्व आल्यास त्यावर देखील नुकसान भरपाई दिली जाते. नोकरीनिमित्त दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांनी पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी  काढावी, असा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो.

व्यक्तिगत अपघाती विमा योजनेत अपघाती मृत्यू, कायमस्वरूपी अपंगत्व, कायमस्वरूपी अंशतः अपंगत्व, अल्पकालीन अकार्यक्षमता आदी गोष्टींसाठी विमा कवच मिळते. मात्र, ग्राहकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार उद्भवणाऱ्या काही धोक्यांसाठीही सुरक्षाकवच पुरवले आहे. व्यक्तिगत अपघात विमा योजनेत साहसी खेळांमधील खेळाडूंना विमा पॉलिसी डिझाईन करण्यात आली. साहसी खेळांमध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येकासाठी बेसिक अॅडव्हेंचर पॉलिसी बाजारात उपलब्ध आहे. ज्याआधारे त्यांना अपघाताबरोबरच मृत्यू, अपंगत्व, रुग्णालयातील काळ आणि उंच बर्फाच्छादित शिखरे, पर्वतरांगा, समुद्र, दुर्गम भागातून हवाई किंवा अन्य मार्गाने सुटका व प्राथमिक उपचारांसाठी विमा कवच मिळू शकते.

पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीमध्ये एअर अॅम्ब्युलन्सचा खर्च, रुग्णवाहिकेचा खर्च, कर्जाचा मासिक हप्ता किंवा अवयव फ्रॅक्चर झाल्यास त्यावर उपचारांचा खर्च दिला जातो. आरोग्य विमा पॉलिसीप्रमाणेच एकाच योजनेद्वारे संपूर्ण कुटुंबासाठी हा विमा उतरवता येतो. यामध्ये प्रत्येकासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात. हेल्थ इन्शुरन्सच्या तुलनेत पर्सनल अॅक्सिडेंटचा प्रिमीयम कमी असतो. ज्यांनी कर्ज काढले आहे आणि फेडत आहेत अशांसाठी पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स महत्वाचा मानला जातो.अचानक अपघात झाल्यास उर्वरित मासिक हप्ते भरण्याची हमी पॉलिसीमध्ये घेतली जाते.

पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसीचे फायदे

  • पर्सनल अॅक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी दोन प्रकारात उपलब्ध आहे. व्यक्तिगत अपघात विमा आणि ग्रुप अॅक्सिडेंट इन्शुरन्स अशा दोन प्रकारात ही विमा पॉलिसी मिळते.  
  • पॉलिसीधारकाचा अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबियांना किंवा वारसांना नुकसान भरपाई मिळते.
  • किमान प्रिमीयमवर या पॉलिसीमध्ये मोठ्या रकमेचा विमा मिळतो.
  • ही पॉलिसी घेण्याची आणि दावा करण्याची प्रक्रिया सोपी आहे. बहुतांश कंपन्यांची 24*7 कॉलसेंटर सेवा आहे.
  • सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केल्यास अपघाती मृत्यूला दुप्पट भरपाई दिली जाते.
  • ग्राहकांच्या त्यांच्या गरजेनुसार देखील पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर घेता येते.

‘या’ गोष्टींसाठी भरपाई मिळत नाही

पॉलिसी केवळ अपघाताशी संबधित असल्याने पॉलिसीधारकाचे नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याला नुकसान भरपाई मिळत नाही. त्याचबरोबर बाळाचा जन्म, पॉलिसी घेण्यापूर्वीचे अपंगत्व, आत्महत्या, एखाद्या गुन्ह्यात सहभाग असल्यास आणि त्यातून अपघात झाल्यास नुकसान भरपाई मिळत नाही. मानसिक समतोल ढासळलेल्या व्यक्तिला अपघात विमा असूनही नुकसान भरपाई मिळत नाही.