Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shark Tank India 2: जाणून घ्या, करोडोंची मालकिन असलेल्या यशस्वी बिझनेस वुमन नमिता थापर यांच्याबाबत...

Successful Business Women Namita Thapar:

Image Source : http://www.commons.wikimedia.org/

Successful Business Women Namita Thapar: 'शार्क टॅंक इंडिया' या रियालिटी शो च्या माध्यमातून प्रसिध्दीझोतात आलेल्या यशस्वी बिझनेस वुमन नमिता थापर यांचे बालपण, शिक्षण व करियरबाबत थोडक्यात जाणुन घेऊयात.

Shark Tank India 2: शार्क टॅंक इंडिया या बिझनेससंबंधी रियालिटी शो चा चाहतावर्ग मोठा आहे. नुकताच या शो चा दुसरा सीजन सुरू झाला आहे. या शो मधील ‘जज नमिता थापर’ (Namita Thapar) या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यांच्याकडे एक यशस्वी बिझनेस वुमन म्हणून पाहिले जाते. आज त्यांच्या यशाचे हे सूत्र जाणून घेऊयात.

नमिता थापर कोण आहे? (Who is Namita Thapar)

नमिता थापर यांची ओळख एक यशस्वी बिझनेस वुमन म्हणून आहे. सध्या त्या एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेड (Emcure Pharmaceuticals Limited) कंपनीच्या CEO म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच नमिता या इनक्रेडिबल व्हेंचर्स लिमिटेडच्या संस्थापक आणि सीईओ पदावर आहेत. आज त्या शार्क टॅंक इंडिया या रियालिटी शो व्दारे नवउद्योजकांच्या बिझनेसमध्ये गुंतवणूक करतात.

बालपण (Childhood)

प्रसिद्ध उद्योगपती नमिता थापर यांचा जन्म 21 मार्च 1977 रोजी पुणे या ठिकाणी झाला. त्यांचे शिक्षणदेखील पुणे शहरात झाले आहे. त्यांनी महाविदयालयीन पदवी ही पुणे विद्यापीठातून घेतली आहे. यानंतर त्यांनी ICAI मधून चार्टर्ड अकाउंटची पदवी मिळवली. 2001 मध्ये त्यांनी ड्यूक युनिव्हर्सिटी, नॉर्थ कॅरोलिना येथून एमबीएची पदवी संपादन केली.

करियर (Career)

नमिता थापर यांच्या कारकीर्दीची सुरूवात GlaxoSmithKline, Guidant Corporation of America मधून सुरू झाली. येथे काम करताना त्यांनी अनेक वेगवेगळ्या पदांवरदेखील काम केले. यानंतर त्यांनी पुण्यात येऊन वडिलांच्या बिझनेसमध्ये हातभार लावला. हा त्यांचा बिझनेस सांभाळता त्या आज उच्च पदावर येऊन पोहोचल्या आहेत. तसेच त्या देशात नवनवीन उद्योजकता शिक्षण सुरू करण्याचे कामही करत आहेत. यासोबतच नमिता फिनोलेक्स केबल्स लिमिटेडच्या बोर्डाच्या सदस्या असून यंग प्रेसिडेंट्स ऑर्गनायझेशनमध्येही सक्रिय आहे.

विवाह (Marriage Life)

नमिता थापर यांच्या पतीचे नाव विकास थापर असून, त्यांना वीर थापर आणि जय थापर अशी दोन मुले आहेत. हे कपल आपलं वैवाहिक आयुष्य खूप आनंदाने जगत आहेत.

संपत्ती (Wealth)

यशस्वी महिला उद्योगपती नमिता थापर यांच्याकडे एकूण संपत्ती 600 कोटी रूपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. त्या बिझनेस, शो व आदि च्या माध्यमातून अधिक पैसा कमवित आहेत.

पुरस्कार (Award)

यशस्वी महिला उदयोजिका म्हणून नमिता थापर यांना '2018 इकॉनॉमिक टाइम्स 40 अंडर फोर्टी अवॉर्ड' आणि 'इकॉनॉमिक टाइम्स द्वारे 2018 विमेन अहेड लिस्ट' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.