Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ललित मोदींच्या wealth आणि Lifestyle विषयी घ्या जाणून

Lalit Modi Wealth

Image Source : www.sportsunfold.com

KK Modi Family Trust ची सूत्र नुकतीच ललित मोदी यांनी आपल्या मुलाकडे सोपवली आहेत. ते निवृत्त झाले असले तरी विश्वस्त म्हणून राहणार आहेत. आपली मुल आपल्यासाठी समान आहेत. पण नेता एकच असू शकतो असे म्हणणाऱ्या ललित मोदींची wealth and Lifestyle कशी आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेऊया.

ललित मोदींनी आयपीएल सुरू केले. ते 2005 ते 2010 पर्यंत बीसीसीआयचे उपाध्यक्ष होते. 2008 ते 2010 पर्यंत ते आयपीएलचे अध्यक्ष  होते. 2010 मध्ये त्यांना  हेराफेरीच्या आरोपावरून आयपीएलमधून निलंबित करण्यात आले होते. मनी लाँड्रिंगचा आरोप झाल्यानंतर 2010 मध्ये ते देश सोडून गेले होते.

12 हजार कोटींच्या कंपनीचे  मालक

ललित मोदींच्या ट्विटर बायोनुसार, ते मोदी एंटरप्रायझेसचे चेअरमन आहेत. मोदी एंटरप्रायझेसची एकूण संपत्ती 12 हजार कोटी रुपये आहे. कंपनी अॅग्रो, तंबाखू, पान मसाला, माउथ फ्रेशनर, कन्फेक्शनरी, रिटेल, एज्युकेशन, कॉस्मेटिक, मनोरंजन आणि रेस्टॉरंटच्या व्यवसायात गुंतलेली आहे. भारताबरोबरच, कंपनीचा व्यवसाय मध्य पूर्व, पश्चिम आफ्रिका, दक्षिण-पूर्व आफ्रिका, दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिका येथे विस्तारला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ललित मोदींची एकूण संपत्ती 4.5 हजार कोटी आहे.

Lalit Modi यांचे  7000 स्क्वेअर फूटचे अलिशान निवास 

भारतातून पळून गेल्यानंतर ललित मोदी लंडनच्या 117, स्लोन स्ट्रीट येथील प्रतिष्ठित पाच मजली बंगल्यात राहतात. ते 7000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेले आहे. या आलिशान बंगल्यात 8 डबल बेडरूम, 7 बाथरूम, 2 गेस्ट रूम, 4 रिसेप्शन रूम, 2 किचन आणि एक लिफ्ट आहे. मोदींनी ते  भाड्याने घेतले आहे

ललित मोदी 2022 मध्ये सुष्मिता सेनसोबतच्या नात्यामुळे प्रसिद्धीस आले. सुष्मिता सेनसोबतचे  फोटो शेअर केले आहेत. दोघांचेही लग्न होण्याची शक्यता होती, पण खुद्द मोदींनीच ते फेटाळून लावले होते.

बऱ्याच वर्षांपूर्वी अमेरिकेत असताना ललित मोदी आणि त्याच्या तीन मित्रांनी अर्धा किलो कोकेन 10,000 डॉलर्समध्ये विकत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोकेन विक्रेत्याने बंदूक जोरावर मोदी आणि त्याच्या मित्रांचे पैसे लुटले. दुसर्‍या दिवशी मोदी आणि त्यांच्या मित्रांनी सहभागी असल्याच्या संशयावरून एका विद्यार्थ्याला मारहाण केली.1 मार्च 1985 रोजी रोजी  ललित मोदी आणि आणखी एका विद्यार्थ्यावर कोकेन तस्करी आणि अपहरणाचा आरोप ठेवण्यात आला होता. यानंतर मोदींनी आपली चूक मान्य केली. न्यायालयाने सुरुवातीला  दोन वर्षांच्या शिक्षणाची शिक्षा सुनावली, पण नंतर ती बदलून 100 तास सामुदायिक सेवा अशी केली.

1986 मध्ये कौटुंबिक व्यवसायात सामील, 2010 मध्ये अध्यक्ष 

मोदी 1986 मध्ये भारतात परतले आणि आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. 1987 ते 1991 पर्यंत ते इंटरनॅशनल टोबॅको कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष होते. 1989 मध्ये, मोदी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडचे गैर-कार्यकारी आणि स्वतंत्र संचालक बनले, जे देशातील सर्वात मोठ्या तंबाखू कंपन्यांपैकी एक आहे.
ललित मोदींची कौटुंबिक कंपनी मोदी एंटरप्रायझेस आणि फिलिप्स मॉरिस इंटरनॅशनल यांच्यासोबत गॉडफ्रेचा संयुक्त उपक्रम असेल. 1992 मध्ये, ते गॉडफ्रे फिलिप्स इंडियाचे कार्यकारी संचालक बनले, ते पद त्यांनी ऑगस्ट 2010 पर्यंत सांभाळले. 2010 मध्ये त्यांचे वडील केके मोदी यांनी घोषणा केली की ललित मोदी मोदी कुटुंबाचा व्यवसाय, मोदी एंटरप्रायझेस आणि त्याच्याशी संबंधित कंपन्या ताब्यात घेतील.