तुमच्याकडे कार असेल तर तुम्ही सर्वसमावेशक सुविधा उपलब्ध असलेला विमा काढण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. भारतातील मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणावर चालणाऱ्या प्रत्येक वाहनाला विमा संरक्षण हे अनिवार्य आहे. बाजारात अनेक विमा कंपन्या आहेत, ज्या वेगवेगळ्या विमा सुविधा देतात. त्यामुळे कार खरेदी करताना अथवा विमा रिन्यू करत असताना तुम्ही विश्वासार्ह विमा कंपनीची आणि योग्य विमा पॉलिसीची निवड करणे गरजे आहे. कारसाठी विमा पॉलिसी घेत असताना कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
योग्य प्रकारचा विमा निवडणे-
कार विमा पॉलिसी मुख्यत्वे दोन प्रकारात आहेत. त्यामध्ये थर्ड-पार्टी इन्शुरन्स आणि सर्वसमावेशक विमा (Comprehensive Car Insurance Policy) प्रकार आहेत. थर्डपार्टी विमा हा तुम्हाला अनिवार्य आहे. तुमच्या वाहनामुळे समोरच्या पक्षकाराचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास यामध्ये भरपाई कव्हर केली जाते. तर या प्रकारची विमा पॉलिसी संपूर्ण संरक्षण प्रदान करते. यात तृतीय-पक्षाच्या दायित्वे तसेच तुमच्या वाहनाचे नुकसान दोन्ही समाविष्ट आहे. तसेच, सर्वसमावेशक कव्हरसह, अपघातामुळे तुमचा मृत्यू झाल्यास तुम्हाला भरपाई मिळू शकते; कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळेल. या दोन्ही पैकी सर्वसमावेशक विमा पॉलिसीची निवड करणे अधिक गरजेचे आहे. याशिवाय तुम्ही विमा निवडताना पॉलिसीचे अतिरिक्त फायदे आणि कव्हरसह इतर अनेक पर्यायाचाही विचार करायला हवा.
आपल्या गरजांचे मूल्यांकन निश्चित करा-
काही वेळेस आपल्या कारचे बाजारमूल्य हे जास्त असते अशावेळी अपघात झाल्यास दुरुस्तीसाठी येणारा खर्चही तितकाच महागडा असतो. त्यामुळे तु्म्ही विमा काढत असताना अशा आपत्कालीन परिस्थितीमधील धोके अथवा गरजांचा विचार करून विमा पॉलिसीची निवड करा.
विमा कंपनीची प्रतिष्ठा
तुम्ही विचार करत असलेल्या विमा कंपन्यांची प्रतिष्ठा आणि आर्थिक स्थिरता याबाबींचाही विचार करा. संबंधित विमा कंपनीबाबत ग्राहकांचा अनुभव, प्रतिक्रिया, रेटिंग आणि कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या कोणत्याही तक्रारीची पडताळणी करा. भारतातील प्रतिष्ठित विमा कंपन्या त्यांचे क्लेम सेटलमेंट रेशो याची पडताळणी करा. विमा कंपनीद्वारे प्रदान केलेल्या ग्राहक सेवेचा स्तर विचारात घ्या. एक विश्वासार्ह आणि प्रतिष्ठित विमाकंपनी ग्राहकांचे क्लेम तातडीने हाताळते आणि ग्राहकांच्या संतुष्टीचा विचार करून सेवा प्रदान करते. त्यामुळे तुम्ही अशा प्रतिष्ठित कंपनीकडून विमा खरेदी करण्याचा विचार करा.
पॉलिसी आणि कव्हरेजची तुलना करा
तुम्हाला आवश्यक असलेल्या कव्हरेजसाठी वेगवेगळ्या विमा प्रदात्यांकडून कोट्स मिळवा. प्रीमियम, वजावट, अॅड-ऑन आणि पॉलिसी अटींची तुलना करा. नो क्लेम बोनस (NCB) संरक्षण, वैयक्तिक अपघात कव्हर, अॅक्सेसरीजसाठी कव्हरेज यासह अपघात अथवा बिघाड झाल्यास दुर्घटनास्थळी टोइंगची सुविधा, अशा अनेक सुविधा देणार्या विमा पॉलिसी उपलब्ध आहेत. यासारख्या घटकांकडेही लक्ष द्या.
पॉलिसीच्या अटी आणि शर्ती, सवलती
तुमच्या प्रीमियम कमी करू शकतील अशा कोणत्याही उपलब्ध सवलती किंवा फायद्यांची चौकशी करा. तुमच्याकडे त्याच कंपनीच्या इतर विमा पॉलिसी असल्यास त्यांच्याकडून काही सवलती मिळतात का याचीही चौकशी करायला विसरू नका. तसेच विमा खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी पॉलिसीच्या अटी आणि नियम काळजीपूर्वक वाचा. पाॉलिसी रद्द करण्याचे धोरण, क्लेम करण्याची प्रक्रिया याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या.
गॅरजचे नेटवर्क
विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये किती गॅरेजस् आहेत. त्यांच्याकडून मिळणारी सुविधा कशा प्रकारची आहे. तुमच्या भागात अधिकृत गॅरजचा विमा पॉलिसीच्या नेटवर्कमध्ये समावेश आहे का? या सर्व गोष्टींचाही विचार विमा पॉलिसी घेण्यापूर्वी करणे आवश्यक आहे.
वरील सर्व महत्त्वा्च्या मुद्द्यांसह तुम्ही वेळोवेळी तुमच्या विमा गरजांचे पुनरावलोकन करणे आणि आवश्यकतेनुसार त्याची पूर्तता करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही विमा व्यावसायिक किंवा एजंटचा सल्ला घ्या जे तुमच्या विशिष्ट परिस्थितीनुसार वैयक्तिक सल्ला देऊ शकतात.