Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ESIC नोंदणी प्रक्रिया व कागदपत्रांबद्दल जाणून घ्या?

ESIC नोंदणी प्रक्रिया व कागदपत्रांबद्दल जाणून घ्या?

कर्मचारी राज्य विमा कायद्यातील कलम 2(12) अनुसार, ESI ही योजना ज्या कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत, त्यांना लागू होते. कंपन्यांसह हॉटेल्स, दुकाने, चित्रपटगृह, वर्तमानपत्रांची कार्यालयं, रोड मोटार ट्रान्सपोर्ट यांनाही ही योजना लागू होते.

 केंद्र सरकार देशातील कामगारांना विविध प्रकारची सामाजिक सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी सरकारने विविध योजना तयार केल्या आहेत. त्यात संबंधित व्यक्तीली व त्याच्या कुटुंबियांना विम्यासह (Insurance) इतर फायदे दिले जातात. सरकार काही योजना पूर्णत: मोफत पद्धतीने राबवत आहे; तर काही अंशदायी योजना आहेत. ज्यात कर्मचारी आणि नियोक्ता या दोघांचे योगदान आहे. 

सरकारने कामगारांचे आरोग्य सुरक्षित करण्यासाठी कर्मचारी राज्य विमा कायदा, 1948 (ESI Act) आणला होता. ज्याला कर्मचारी राज्य विमा महामंडळ (Employees State Insurance Corporation-ESIC) म्हणून ओळखलं जातं.  केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या  (Ministry of Labour & Employment, govt of India) अंतर्गत ESIC ही कायद्यांतर्गत स्थापन केलेली संस्था आहे. या संस्थे अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या योजनेद्वारे कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवली जाते.

ESIC योजना कोणाला लागू होते?

कर्मचारी राज्य विमा कायद्यातील कलम 2(12) अनुसार, ESI ही योजना ज्या कंपन्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत, त्यांना लागू होते. कंपन्यांसह हॉटेल्स, दुकाने, चित्रपटगृह, वर्तमानपत्रांची कार्यालयं, रोड मोटार ट्रान्सपोर्ट यांनाही ही योजना लागू होते. महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये किमान कर्मचाऱ्यांची संख्या 20 इतकी आहे. या याव्यतिरिक्त, ESIC योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्याचे प्रति महिन्याचे वेतन 21,000 रुपये तर अपंग कर्मचाऱ्याचे प्रति महिना वेतन 25,000 रुपये असेल तरच त्याला या योजनेचा लाभ घेता येईल.

ESIC साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून कंपनीद्वारे (Employer) याची ऑनलाईन नोंदणी करता येते. ती आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊ.

1.कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या वेबसाईटच्या होमपेजवरील Employer Login या टॅबवर क्लिक करा.

ESIC LOGIN


2. Sign Up पर्यायावर क्लिक करा. 

ESIC LOGIN -1


3. Sign Up फॉर्ममध्ये कंपनीचे नाव, मुख्य नियोक्त्याचे नाव, राज्य, प्रदेश,  ईमेल आणि फोन नंबर ही माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा. 

ESIC LOGIN -2

4. Sign UP केल्यानंतर तुमच्या ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरवर लॉगिन करण्यासाठी युझरनेम आणि पासवर्ड येईल. 

5. ESIC पोर्टलवर जाऊन साइन इन करून नवीन नियोक्ता नोंदणी (New Employer Registrtion) या पर्यायावर क्लिक करा. 

6. ड्रॉपडाउन मेनूमधून योग्य पर्याय निवडून सबमिट करा.  

7. त्यानंतर नियोक्ता नोंदणी – फॉर्म 1 (Employer Registration Form 1) ओपन होईल. त्यातील माहिती भरून सबमिट करा. 

8.फॉर्म सबमिट झाल्यानंतर पैसे भरण्यासाठी Payment Mode चा पर्याय निवडावा लागेल. कंपनीला किमान सहा महिन्यांसाठीचे आगाऊ योगदान देणे आवश्यक आहे. 

9. पेमेंटची प्रक्रिया यशस्वीपणे झाल्यानंतर नोंदणी पत्र (C-11) कंपनी मालकाला पाठवले जाईल. हे पत्र ESIC नोंदणीचा पुरावा म्हणून वापरले जाते. यावर ESIC विभागाकडून प्रत्येक कंपनीला 17 अंकी विशिष्ट क्रमांक दिला जातो.

ESIC नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

  • कंपनीला दुकाने व आस्थापना कायद्यांतर्गत मिळालेले नोंदणी प्रमाणपत्र/परवाना
  • कंपनी आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या पॅनकार्डच्या प्रती
  • बँक स्टेटमेंट
  • पत्त्याचा पुरावा
  • भाडे पावती/इमारत टॅक्स/ मालमत्ता टॅक्सची पावती
  • कंपनीची पार्टनरशिप किंवा ट्रस्ट डीड 
  • CST/ST/ GST क्रमांक
  • कंपनीचे संचालक आणि भागधारकांची नावे
  • कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा तपशील
  • कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक पगाराची प्रत


कंपनीची ESI नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली की, कंपनीचे कर्मचारी हे या योजने अंतर्गत लागू होणाऱ्या विमा संरक्षणास पात्र होतात. पात्र कर्मचारी कंपनीला मिळालेल्या 17 अंकी विशिष्ट क्रमांकाच्या मदतीने ESIC पोर्टलवर स्वत:ची नोंद करू शकतात.