डाऊ जोन्स इंडस्ट्रियल average (DJIA) अमेरिकी शेअर बाजारामधील सर्वाधिक उलाढाल असणाऱ्या निर्देशांकापैकी एक आहे. 19 व्या शतकात याची स्थापना झाली. Dow Jones च्या स्थापनेपासूनच्या कालावधीचा विचार केला तर असे म्हणता येते की, हा केवळ मोठ्या औद्योगिक कंपन्यांच्या किमतीच दर्शवतो आहे असे नव्हे तर गेल्या शतकातील अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकास देखील सूचित करतो.
Dow Jones निर्देशांक सुरुवातीला 12 स्टॉकच्या किमतीने तयार झाला होता. यानंतर कालांतराने यातील शेअर्सची वाढ होत गेली. 1920 च्या अखेरपर्यंत एकूण 30 कंपन्यांचे शेअर्स याच्यामध्ये समाविष्ट झाले. याच्यामध्ये 30 कंपन्या झाल्यानंतर हा Dow Jones 30 च्या नावाने ओळखला जाऊ लागला. आताही याच नावाने ओळखला जात आहे. निर्देशांकाच्या सुरुवातीला ज्या 12 कंपन्या होत्या त्यातील एकही आता बाकी नाही. आता Adani vs Hindenburg संघर्षांनंतर अदानी समूहाच्या शेअर्सच्या उलथापालथी झाल्या त्यामुळे Adani Group देखील यातून बाहेर गेला आहे.
Dow index हा अमेरिकी वित्तीय बाजाराचा एक बेंचमार्क आहे. आशियाई स्टॉक एक्स्चेंजमधील महत्वपूर्ण अशा हँगसंग इंडेक्सप्रमाणे DJI 30 त्या शेअरवर अवलंबून आहे जे यात समाविष्ट आहेत.
Dow Jones कोण होते ?
डाऊ जोन्स ही एकच व्यक्ती नव्हती तर 1882 मध्ये डाऊ जोन्स अँड कंपनीची स्थापना करणाऱ्या तीनपैकी ते दोन जण होते. चार्ल्स डाऊ, एडवर्ड जोन्स आणि चार्ल्स बर्गस्ट्रेसर हे कंपनीचे तिसरे संस्थापक होते. 1889 मधील त्यांचे वॉल स्ट्रीट जर्नल हे जगातील सर्वात प्रभावशाली आर्थिक प्रकाशनांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
लोकांसाठी क्लिष्ट आर्थिक बातम्या समजावून सांगण्याच्या क्षमतेसाठी डाऊ ओळखले जात होते. त्यांचा असा विश्वास होता की शेअर बाजार वाढत आहे की घसरत आहे हे सूचित करण्यासाठी गुंतवणूकदारांना एक साधा बेंचमार्क आवश्यक आहे. डाऊने पहिल्या निर्देशांकासाठी अनेक औद्योगिक-आधारित स्टॉक्स निवडले आणि प्रथम नोंदवलेले सरासरी 40.94.1 अशी होती. चार्ल्स डाऊ यांचा असा विश्वास होता की विविध प्रकारच्या समभागांच्या किमतीच्या हालचालींवर आधारित शेअर बाजाराच्या हालचालींचा अंदाज लावणे शक्य आहे.