Daily Expense Tracker Apps: फायनान्सचे सल्ला देणारे किंवा अगदी आपल्या घरातील मोठी मंडळीसुद्धा नेही आपल्याला लहान-लहान खर्चावर नियंत्रण ठेवण्याबाबत सांगत असतात. याबाबत इंग्रजीमध्ये एक फेमस वाक्यसुद्धा वापरलं जातं. ते म्हणजे, Beware of litter expenses. ज्यांना खरंच आपला खर्च आटोक्यात आणायचा आहे; त्यांच्यासाठी हे वाक्य पुराणातील श्लोकानुसार तितकेच महत्त्वाचे आहे.
डिजिटल पेमेंटच्या सुविधांमुळे आता खर्चावर नियंत्रण राहिले नाही. अगदी छोट्या-छोट्या खर्चासाठी सर्रास युपीआयचा (गुगल पे, फोन पे, पेटीएम आदी) वापर केला जात आहे. या खर्चाचा मात्र कुठेच हिशोब ठेवला जात नाही. त्यामुळे दिवसभरात किती पैसे खर्च होतात, हे कळतच नाही. यासाठी आम्ही तुमच्यासाठी अशी काही ॲप्सची माहिती घेऊन आलो आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही खर्चाचा ट्रॅक ठेवून त्यावर नियंत्रण आणू शकता.
ऑनलाईन पेमेंटचा वापर बंद करावा का?
अनेकजणांचे असे म्हणणे असते की, ऑनलाईन पेमेंटच्या वाढत्या वापरामुळे खर्च किती आणि कसा होतो, हे कळत नाही. त्यामुळे ऑनलाईन पेमेंटचा वापर बंद केला तर खर्चात कपात होईल का? याचे उत्तर लगेच हो किंवा नाही असे सांगता येणार नाही. कारण प्रत्येकाची सवय आणि परिस्थिती वेगळी असते. पण गोष्ट मात्र नक्की सांगू शकतो की, सध्याच्या डिजिटल पेमेंटच्या युगात तुम्ही रोख पैशांनी किती व्यवहार करणार.आता तर अनेक ठिकाणी रोख व्यवहार हळुहळू बंद होऊ लागले आहेत. तसेच डिजिटली पद्धतीने पेमेंट जलद आणि अचूक होण्याची शक्यता जास्त आहे.
खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या ट्रॅकरची गरज का?
आपल्याकडे येणाऱ्या आणि खर्च होणाऱ्या पैशांची नोंद असेल तर त्यातून अनावश्यक आणि महत्त्वाचे खर्च अशी विभागणी करणे सोपे पडते. तसेच त्यामुळे अनावश्यक खर्चाचे प्रमाण कमी करण्यास देखील मदत होते. पण आजकाल आपण वही आणि पेन सोबत ठेवून प्रत्येक खर्च लिहून ठेवू शकत नाही. यासाठी एखाद्या Daily Expense Tracker ची मदत घेतल्यास खर्चाचा हिशोब ठेवायला सोपे होते.
- Daily Expense Tracker मधून दिवसाचे व महिन्याचे बजेट मांडता येते.
- सर्व खर्च दिवसनुसार एकाच ठिकाणी मांडता येतो.
- एका क्लिकवर महिन्याचा खर्च मोजता येऊ शकतो.
- अपेक्षित बचत आणि खर्च याचे टार्गेट सेट करता येते.
- जमा-खर्चाचा डॅशबोर्ड सीए किंवा आर्थिक सल्लागारांशी शेअर करू शकता.
- प्रत्येक महिन्यातील खर्चाची तुलना करू शकता.
खर्चावर नियंत्रण ठेवणाऱ्या बेस्ट ट्रॅकर ॲप्स
- Money Manager Expense & Budget
- Wallet - Daily Budget & Profit
- Buddy: Budget & Save Money
- Spending Tracker
- Expensify
वरील ॲप्सच्या मदतीने तुम्हाला बजेट मॅनेजमेंटची सवय होईल. जेणेकरून तु्म्ही तुमचे अनावश्यक खर्च टाळू शकता. त्यातून तुमची बचत वाढेल आणि गुंतवणूकसुद्धा. यातील काही ॲप्स बिले सेव्ह करण्याची सुविधासुद्धा देतात. त्यामुळे तुम्हाला महिन्याभराच्या पावत्या जपून ठेवण्याची गरज नाही. ट्रॅकर ॲपच्या मदतीने तुमचा बचतीचा प्रवास नक्कीच सुकर होऊ शकतो.