Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ayushman Bharat Health Account: जाणून घ्या आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट आणि त्याचे फायदे

Ayushman Bharat Health Account

Ayushman Bharat Health Account: केंद्र सरकारने 27 सप्टेंबर 2021 रोजी भारतीयांना डिजिटल हेल्थ आयडीचा (ओळखपत्र) देण्याचा शुभारंभ केला होता.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त डिजिटल हेल्थ कार्ड दिली जात आहेत.

भारतीयांच्या आरोग्याचा रेकॉर्ड हॉस्पिटल्स आणि दवाखान्यांना सहज उपलब्ध व्हावा या उद्देशाने केंद्र सरकारने आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ अकाउंट हा उपक्रम सुरु केला आहे. याअंतर्गत भारतीयांना डिजिटल हेल्थ आयडी(ABHA-Health ID)दिले जाते. या विशिष्ट अकाउंटमध्ये नागरिकाचा हेल्थ रेकॉर्ड जतन केला जाणार आहे. जो भविष्यात उपचारावेळी उपयोगी पडेल.

डिजिटल हेल्थ आयडी हा 14 आकडी हेल्थ आयडेंटिफिकेशन नंबर आहे जो नागरिकाचा मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांकाच्या सहाय्याने तयार केलेला आहे. हेल्थ आयडीमुळे विमा कंपन्या, हॉस्पिटल्स यांना युजर्सचा हेल्थ डाटा सहजपणे उपलब्ध होईल. हेल्थ आयडीमुळे संबधित कार्डधारकाला झालेल्या आजाराचे निदान करणे, योग्य औषध उपचार करणे सोपे जाणार आहे. 
हे कार्ड केवळ नागरिकांसाठीच महत्वाचे नाही तर सरकारसाठी देखील अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. हेल्थ आयडीच्या माहिती आधारे सरकारला आरोग्यविषयक योजना तयार करणे, त्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि राज्यांना अर्थसहाय्य करणे सोपे जाणार आहे.

डिजिटल हेल्थ आयडी आरोग्य सेवा क्षेत्रासाठी क्रांतिकारक ठरण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरातील रुग्णालये डिजिटली एकमेकांशी जोडली जातील.  डिजिटल हेल्थ आयडी हे पूर्णपणे निशुल्क आणि ऐच्छिक आहे. नॅशनल हेल्थ ऑथोरिटीच्या वेबसाईटवर तुम्हाला   डिजिटल हेल्थ आयडी किंवा ABHA नंबर काढता येईल. यासाठी आधार कार्ड किंवा वाहन परवाना (Driving License) तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे. आधारच्या माध्यमातून करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक मोबाईल क्रमांकाशी लिंक असणे आवश्यक आहे.

आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंटचे फायदे (Benefits of Ayushman Bharat Health Account (Health ID) for the Citizens)

  1. आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट किंवा डिजिटल हेल्थ कार्ड हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांचा हेल्थ रेकॉर्ड जतन करण्याची पहिली पायरी आहे.
  2. हेल्थकार्डधारकाला उपचारांपूर्वी हेल्थेकेअर प्रोफेशनल रजिस्ट्रीमधून (HPR) डॉक्टर्सचा अनुभव आणि शिक्षणाची माहिती जाणून घेता येईल.
  3. त्याचरबरोबर खासगी आणि सार्वजनिक आरोग्य सुविधांची माहिती देखील हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्रीमधून मिळवता येईल.
  4. डॉक्टरकडे जाताना कार्डधारक हेल्थकार्ड दाखवू शकतो.ज्यातून डॉक्टर्सला कार्डधारकाची आजारांची हिस्ट्री, आतापर्यंत झालेले उपचार, औषधे, रुग्णालयातून झालेली सुट्टी, मेडिकल टेस्ट, रिपोर्ट यांची माहिती तपासता येईल.
  5. कोव्हीड-19 सारख्या महामारीमध्ये डिजिटल हेल्थ आयडी खूपच फायदेशीर आहे. व्यापक प्रमाणात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहीमेत या कार्डाचा फायदा होऊ शकतो.हेल्थ आयडी असणाऱ्या कार्डधारकाला  देशभरात कुठेही उपचार घेणे सहज शक्य आहे.