Aman Gupta Biography: अमन गुप्ता यांचे नाव मोठया उद्योगपतींच्या यादीमध्ये घेतले जाते. ‘शार्क टॅंक इंडिया’ शो च्या माध्यमातून ते एक सेलेब्रिटीच बनले आहे. बोट (BOAT) कंपनीचे संस्थापक असणाऱ्या या यशस्वी उद्योजकाचा प्रवास हा काय साधा नव्हता. त्यांनादेखील बराच खडतर प्रवास करावा लागला. अशा या यशस्वी बिझनेसमॅनचे सुरूवातीचे दिवस, शिक्षण, करियर व वार्षिक कमाईबाबत जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
बालपण (Childhood)
अमन गुप्ता यांचा जन्म 16 ऑगस्ट 1982 रोजी, नवी दिल्ली येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कोचर गुप्ता असून वडिलांचे नाव नीरज गुप्ता आहे. त्यांचे बालपण अतिशय साधे होते. त्यांना प्रत्येक छोटी-मोठी गोष्ट मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
शिक्षण (Education)
अमन गुप्ता यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल, आरके पुरम सारख्या दिल्लीतील विविध शाळेतून झाले. नंतर त्यांनी बी.कॉमसाठी शहीद भगतसिंग कॉलेजमध्ये प्रवेश केला. ते ही 1999 मध्ये, वडिलांच्या सल्ल्यानुसार, त्यांनी अकाउंटंट होण्यासाठी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतले. मात्र अकाउंटमध्ये रस नसल्यामुळे त्यांनी मध्येच शिक्षण सोडले. यानंतर त्यांनी इंडियन स्कूल ऑफ बिझनेस इन फायनान्स अँड स्ट्रॅटेजी कॉलेजमधून एमबीए केले.
करियर (Career)
अमित गुप्ता यांनी शिक्षणानंतर सुरुवातीच्या काळात KPMG मध्ये कार्यकारी सल्लागार म्हणून काम केले. 2003 ते 2005 या दरम्यान ते सिटी बँकेत सहाय्यक संचालक म्हणूनदेखील कार्यरत होते. यानंतर त्यांनी सिटीबँकमधील सहाय्यक संचालकाची नोकरी सोडली, कारण त्यांना काहीतरी नवीन व वेगळे करायचे होते. या विचारने त्यांनी Advanced Telemedia Private Limited ची स्थापना केली आणि 2005 ते 2010 पर्यंत ते स्वतः ते कंपनीचे CEO राहिले. त्यानी त्यांच्या कारकिर्दीत d2h चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. सध्या अमित गुप्ता हे ‘बोट’ (BOAT) कंपनीचे मालक आणि सीईओ आहेत.
विवाह (Marriage)
अमन गुप्ता यांचे लग्न 2008 मध्ये ‘प्रिया डागर’ (Priya Dagar) यांच्यासोबत झाले. त्यांना दोन मुली असून अदा गुप्ता आणि मिराया गुप्ता अशी त्यांची नावे आहेत.
बोट कंपनीची स्थापना (Establishment of a Boat Company)
2016 मध्ये अमन गुप्ता यांनी समीर मेहता सोबत 'boAt' ची सह-स्थापना केली आणि सध्या अमन गुप्ता boAt चे CEO म्हणून काम करत आहेत.BOAT ही भारतातील एक आघाडीची ऑडिओ कंपनी आहे. या कंपनीचे इयरफोन, हेडफोन, स्पीकर, ट्रॅव्हल चार्जरला संपूर्ण जगात प्रचंड मागणी आहे. बोटच्या प्रोडक्टची क्रेझ तरूणांमध्ये मोठया प्रमाणात आहे.
संपत्ती (Wealth)
BoAt चे सह-संस्थापक अमन गुप्ता हे दरवर्षी कंपनीकडून तब्बल 40 कोटी रुपये कमवितात. यासोबत, 'शार्क टँक इंडिया 2' मध्ये जज म्हणून प्रति एपिसोडसाठी 9 लाख रुपये घेतात. आजच्या वेळेला अमन गुप्ता हे 700 कोटीं संपत्तीचे मालक आहेत.