Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

किसान विकास पत्र आणि नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट खातं आता ऑनलाईन काढता येणार!

India Post

New Online Services: किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra) आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र म्हणजेच नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट (NSC) या दोन्ही योजनांची खाती आता ऑनलाईन सुरू किंवा बंद करता येणार आहेत.

New Online Services: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दूरसंचार मंत्रालयाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या पोस्ट विभागाने काही योजनांसाठी नव्याने ऑनलाईन सेवा सुरू केली. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (VIII इश्यू) आणि किसाव विकास पत्र या योजनांची खाती ऑनलाईन सुरू व बंद करता येणार आहे. याबाबत पोस्ट विभागाने 18 ऑगस्ट रोजी परिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. आतापर्यंत ही सेवा ऑनलाईन उपलब्ध नव्हती.

पोस्टाने ही सेवा डीओपी (Department of Post)च्या माध्यमातून ऑनलाईन सुरू केली. इच्छुक आता डीओपी इंटरनेट बॅंकिंगच्या मदतीने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (VIII इश्यू) आणि किसान विकास पत्र ऑनलाईन सुरू किंवा बंद करू शकतात. यामुळे आता खाते उघडण्यासाठी बॅंकेत किंवा पोस्टात येण्याची गरज पडणार नाही. तुम्ही घरातूनच एनएससी आणि केव्हीपी (NSC & KVP) खातं सुरू करू शकता.

किसान विकास पत्र (KVP)

डीपार्टमेंट ऑफ पोस्टाद्वारे (DoP) चालविल्या जाणाऱ्या बचत योजनेला किसान विकास पत्र म्हणजेच KVP म्हणतात. 30 सप्टेंबर, 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी या योजनेवर वार्षिक 6.9 टक्के चक्रवाढ व्याज दिले जात आहे. या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी 9 वर्षे 5 महिने आहे.

नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट (NSC)

पोस्टाच्या स्मॉल बचत योजने अंतर्गत राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही बचत योजना राबवली जाते. या योजने अंतर्गत प्रौढ व्यक्ती, अल्पवयीन मुले किंवा ट्रस्टद्वारे खाते सुरू करता येऊ शकते. 30 सप्टेंबर, 2022 रोजी संपणाऱ्या तिमाहीसाठी या योजनेवर वार्षिक 6.8 टक्के चक्रवाढ व्याज दिले जाते. याचा मॅच्युरिटी कालवधील 5 वर्षे आहे.

पोस्टाची इंटरनेट सेवा वापरून एनएससी किंवा केव्हीपी खाते कसं सुरू करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहू.

  • पोस्टाच्या ऑनलाईन बॅंकिंग पोर्टलवर साईन-इन करा.
  • जनलर सर्व्हिसेस अंतर्गत Service Request मध्ये New Request वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला KVP किंवा NSC या दोन्हीपैकी जे खाते सुरू करायचे आहे; त्यावर क्लिक करा.
  • नॅशनल सेव्हिंग सर्टीफिकेट (NSC) खातं सुरू करण्यासाठी किमान 1000 रुपये भरावे लागतात. यापेक्षा जास्त सुद्धा टाकता येते.
  • यानंतर डेबिट खात्याशी लिंक केलेले पोस्टाचे बचत खाते निवडा.
  • इथे दिलेल्या नियम व अटी वाचून Click Here यावर क्लिक करा.
  • त्यानंतर सबमिट ऑनलाईन यावर क्लिक करा.
  • आता ट्रॅन्सॅक्शन पासवर्ड टाका आणि प्रक्रिया पूर्ण करा.


पोस्टाची इंटरनेट सेवा वापरून एनएससी किंवा केव्हीपी खाते बंद कसे करायचे हे आता समजून घेऊ.

  • पोस्टाच्या ऑनलाईन बॅंकिंग पोर्टलवर साईन-इन करा.
  • जनलर सर्व्हिसेस अंतर्गत Service Request मध्ये New Request वर क्लिक करा.
  • तुम्हाला नको असलेले खाते बंद करण्यासाठी NSV किंवा KVP यावर क्लिक करा.
  • आता जे खाते बंद करायचे आहे; ते निवडा आणि त्या खात्यातील रक्कम ज्या बचत खात्यात जमा करायची आहे त्याचा पर्याय निवडा.
  • त्यानंतर ऑनलाईन सबमिट यावर क्लिक करा.
  • आणि शेवटी पासवर्ड टाकून सबमिट करा.