Kia Seltos Panoramic Sunroof 2023 Model : Kia कंपनीने 2019 मध्ये Seltos हे मॉडेल भारतात लॉन्च केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा 4 वर्षांनी कंपनी या मॉडेलमधील नवीन अद्ययावत मॉडेल सेल्टोस फेसलिफ्ट पॅनोरमिक सनरूफ लॉन्च करणार आहे. सध्या या मॉडेलची रोड टेस्ट केली जात आहे. हे मॉडेल लवकरच मार्केटमध्ये येणार आहे.
4 वर्षानंतर दमदार एन्ट्री
2019 मध्ये Kia कंपनीने आपले सेल्टोस मॉडेल भारतातील ग्राहकांपुढे सादर केले होते. तेव्हापासून बाजारात या मॉडेलची चांगली विक्री सुरु आहे. जवळपास 4 वर्षानंतर आता या मॉडेलमध्ये बदल होणार असल्याने, ग्राहकांना मोठा बदल आणि आधुनिक फिचर्स अपेक्षित आहेत.
सनरुफची प्रतिक्षा संपली
भारतात लवकरच लॉन्च केली जाणारी सेल्टोस फेसलिफ्ट मध्ये पॅनोरॅमिक सनरूफची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे. तसेच, वेगळे डिझाइन मिळण्याची अपेक्षा आहे. सेल्टोस फेसलिफ्ट याआधी अमेरिका आणि दक्षिण कोरियामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. त्यामुळे भारतामध्ये हे मॉडेल लवकरच लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे. Kia Seltos च्या पॅनोरामिक सनरूफ गाडीची प्रतिक्षा अनेक ग्राहकांना होती.
काय आहेत वैशिष्टये
सेल्टोस फेसलिफ्ट पॅनोरमिक सनरूफ मॉडेलमध्ये मागील बाजूस टेललाइट्स, ORVM वर 360-डिग्री कॅमेरा,ड्रायव्हर डिस्प्लेसह ब्लाइंडस्पॉट सहाय्य,स्वयंचलित हवामान नियंत्रण, मागील एसी व्हेंट्स, डिजिटल ड्रायव्हर स्क्रीन, क्रूझ कंट्रोल इत्यादी सुविधा मिळू शकतात. सेल्टोस फेसलिफ्टमध्ये पुन्हा डिझाइन केलेले ग्रिल आणि नवीन हेडलॅम्प्स आहे. सोबतच सहा एअरबॅग्ज, हिल-असिस्ट कंट्रोल, वाहन स्थिरता व्यवस्थापन, पार्किंग सेन्सर आणि कॅमेरा यांसारखी वैशिष्ट्ये देखील मिळतील. सेल्टोस फेसलिफ्टमध्ये दोन 10.25-इंच डिस्प्ले देखील मिळतील. त्यापैकी एक इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी आणि दुसरा इन्फोटेनमेंट सिस्टमसाठी उपयोगात येईल.
सेल्टोस फेसलिफ्ट मध्ये यावेळी 115hp, 144Nm, 1.5-लीटर पेट्रोल इंजिन आणि 116hp,250Nm,1.5-लीटर टर्बो-डिझेल इंजिनची सुविधा मिळणार आहे. तसेच नवीन टर्बो-पेट्रोल इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आणि 6-स्पीड iMT सह येऊ शकते.