Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kia Price Hike: किया seltos आणि Carens कार महागणार; कंपनीकडून दरवाढ जाहीर

Kia Car price hike

Image Source : www.kia.com

किया कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जास्त पैसे मोजायला तयार राहा. कारण, कंपनीने सेल्टोस आणि केरेन्स या दोन्ही प्रसिद्ध मॉडेलच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून दरवाढ होईल. किती रुपयांनी कार महाग होईल वाचा.

Kia Price Hike: जर तुम्ही किया कंपनीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 1 ऑक्टोबरपासून जास्त किंमत मोजायला तयार राहा. मात्र, त्यापूर्वीच तुम्ही कार बुक केली तर तुमचे पैसे वाचतील. सर्वाधिक खप होणाऱ्या किया सेल्टोस आणि केरेन्स या दोन्ही गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत.

गाड्यांच्या किंमती किती रुपयांनी वाढतील?

1 ऑक्टोबर पासून किया सेल्टोस आणि केरेन्स या दोन्ही मॉडेलची किंमत 2 टक्क्यांनी वाढणार आहे. कंपनीच्या सेल्स आणि मार्केटिंग विभागाचे प्रमुख हरदीप ब्रार यांनी किंमतवाढीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कंपनीने किया सोनेट या कारची किंमत वाढवली नाही. 

किया सेल्टोसचे टॉप मॉडेल 15 लाखांच्या पुढे येते. त्यामुळे या गाडीची किंमत 30 हजारांपेक्षा जास्त वाढेल. तसेच केरेन्स या MUV च्या टॉप मॉडेलची किंमतही 15 लाखांच्या पुढे आहे. त्यामुळे या कारची किंमत देखील 15 ते 20 हजार रुपयांनी वाढू शकते. नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होतील. मात्र, त्याआधी कार बुक करत असाल तर जुनेच दर लागू होतील.  

कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या

एप्रिल नंतर अनेक कंपन्यांनी दरवाढ केली होती. मात्र, किया कंपनीने किंमती वाढवल्या नव्हत्या. (Kia Seltos and Carens price hike) तसेच वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. कियाने नवे सेल्टोस मॉडेल लाँच केले आहे. यासाठी कंपनीने मोठी गुंतवणूक केल्याने दरवाढ करावी लागत असल्याचे ब्रार यांनी म्हटले. 

यापूर्वी एप्रिल 2023 मध्ये कंपनीने गाड्यांच्या किंमती वाढवल्या होत्या. प्रदूषण नियंत्रणासाठी Real Driving Emission (RDE) डिव्हाइस गाड्यांमध्ये बसवण्यात आल्यानंतर दरवाढ झाली होती.