Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kia EV6 Price Hike: जाणून घ्या, या कारच्या किंमतीत तब्बल 1 लाख रू. ची वाढ

Kia EV6 Price Hike

Image Source : http://www.financialexpress.com/

Kia EV6 Price: नवीन वर्षात स्वप्नातील गाडी 'Kia EV6' खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी मोठा धक्का आहे. कारण या गाडीच्या किंमतीत तब्बल एक लाख रूपयांनी वाढ झाली आहे. ही वाढ का करण्यात आली, याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

Kia EV6 Car: भारतात दक्षिण कोरियन वाहन उत्पादक कंपनी असलेल्या किआ मोटर्सच्या गाडयांना प्रचंड मागणी आहे. या कारकडे स्वप्नातील गाडी म्हणून तरूणवर्ग पाहतो.  मात्र तरूणांच्या या स्वप्नांवर पाणी पडणार आहे. कारण या चार चाकी गाडीच्या किंमतीत तब्बल 1 लाख रूपयांनी वाढ झाली आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.  

कधी केली होती लाँच (When was it Launched)

भारतीय वाहन बाजारात किआ इंडिया कंपनीने मागील वर्षी जून महिन्यात ऑल इलेक्ट्रिक ईव्ही 6 ही कार 59.95 लाख रुपये इतक्या किंमतीत लाँच करण्यात आली होती. ही कार भारतात आयात केली जात असून, या कंपनीची ही भारतातली पहिली इलेक्ट्रिक कार आहे. या कारला ग्राहकांकडून चागला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या कंपनीने या कारच्या किंमतीत तब्बल १ लाख रुपयांची वाढ  करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. या कारच्या GT Line RWD व्हेरिएंटची किंमत 59.95 लाख रुपये इतकी होती. जी आता 60.95 लाख रुपये करण्यात आली. तर GT Line AWD व्हेरिएंटची किंमत 64.95 लाख रुपये इतकी होती, जी आता 65.95 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.

कारचे फीचर्स (Features of the Car)

ही कार 5 सीटर कार असून जी दोन व्हेरिएंट्समध्ये येते. यात जीटी लाइन रियर व्हील ड्राईव्ह आणि जीटी लाइन ऑल व्हील ड्राईव्हचा समावेश आहे. या कारमध्ये 77.4 किलोवॉट क्षमतेची बॅटरी दिली गेली आहे. ही कार सिंगल चार्जवर 708 किमीपर्यंत रेंज देईल. या कारचं सिंगल मोटर रियर व्हील ड्राईव्ह व्हेरिएंट 229 पीएस पॉवर आणि 350 न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते. तर या कारचे डुअल मोटर ऑल व्हील ड्राईव्ह व्हेरिएंट 325 पीएस पॉवर आणि 605 न्युटन मीटर टॉर्क जनरेट करू शकते.

ईव्ही 6 कशी आहे (How is the EV6)

ईव्ही 6 या कारमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टचस्क्रीन इन्फोटेन्मेंटसाठी यामध्ये ड्युअल कर्व्ड 12.3 इंचांचा डिस्प्ले दिला आहे. आहे. यामध्ये 14 स्पीकर मेरिडियन साउंड सिस्टिम, सनरूफ, वायरलेस फोन चार्जिंग, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटीलेटेड आणि पॉवर फ्रंट सीट्स, 8 एअरबॅग्ज आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोलसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात एडीएएस फीचरचादेखील समावेश आहे.