Rustomjee Group चा एक भाग असलेल्या Keystone Realtors चा 635 कोटींचा IPO सध्या गुंतणुकीसाठी खुला आहे. या योजनेसाठी कंपनीने प्रती शेअर 514 ते 541 रुपयांचा प्राईस ब्रॅंड निश्चित केला आहे.गुंतवणूकदारांना किमान 27 शेअर्ससाठी बोली लावावी लागणार आहे. प्रती शेअर 541 रुपयांनुसार एका लॉटसाठी 14607 रुपयांची बोली लावावी लागेल. 16 नोव्हेंबर 2022 रोजी हा इश्यू बंद होणार आहे.
कंपनीकडून 560 कोटींचा फ्रेश इश्यू आणि 75 कोटींची ऑफर ऑन सेलमधून हा भांडवल उभारले जाईल.याशिवाय बोमन इरानी यांच्याकडून 37.5 कोटींचे शेअर्स आणि पर्सी सोराबजी चौधरी आणि चंद्रेश दिनेश मेहता यांच्याकडून प्रत्येकी 18.75 कोटींचे शेअर्स विक्री केले जाणार आहेत.
Keystone Realtors चे मुंबई आणि उपनगरात अनेक निवासी प्रकल्प आहेत.वर्ष 2017 ते 2021 या कालावधीचा विचार केला तर मुंबईतील खारमध्ये कंपनीचा 28% मार्केट शेअर आहे. जुहूमध्ये 23% , बांद्रा पूर्व 11% विरार 14% , ठाणे 3% आणि भांडूपमध्ये 5% मार्केट शेअर आहे.
IPO मधून मिळणारे भांडवल मुख्यत्वे कर्ज फेडीसाठी वापरले जाणार असल्याचे कंपनीने माहिती पत्रकात म्हटले आहे. Keystone Realtors वर 341.6 कोटींचे कर्ज आहे. शेअर विक्रीतून मिळालेले भांडवल कर्ज फेड करणे, नवीन प्रकल्प ताब्यात घेण्यासाठी वापले जाणार आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीअखेर कंपनीला 168.5 कोटींचा एकूण महसूल मिळाला होता. तर 4.22 कोटींचा नफा झाला होता.आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये Keystone Realtorsचा एकूण महसूल 1269 कोटी होता तर नफा 135 कोटी इतका होता.
Keystone Realtors कडून अंदाजे 21 नोव्हेंबर 2022 रोजी शेअर वाटप केले जाण्याची शक्यता आहे. कंपनीची 24 नोव्हेंबर 2022 रोजी लिस्टिंग अपेक्षित आहे. दरम्यान, सोमवारी 14 नोव्हेंबर 2022 रोजी पहिल्याच दिवशी Keystone Realtors च्या IPO ला गुंतवणूकदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला. पहिल्या दिवशी Keystone Realtors चा इश्यू 8% सबस्क्राईब झाला. वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठीचा राखीव हिस्सा 12% आणि नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टरचा हिस्सा 11% सबस्क्राईब झाला आहे. IPO कडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरवल्याने ग्रे मार्केटमध्ये अद्याप Keystone Realtors चा शेअर उपलब्ध झालेला नाही.