जून महिना सुरू झाला असून आता पाऊस पडायला काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. पावसाळ्यात अनेकजण परदेशी सहलींचे नियोजन करतात. थंड वातावरण आणि रिमझिम पडणाऱ्या पावसात फिरायला जाण्याची मजा काही वेगळीच असते. जर तुम्हीही विदेशी सहलींचे नियोजन करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
भारतातील नामांकित टूर्स अँड ट्रॅव्हल कंपनी केसरीने (Kesari) मान्सून स्पेशल परदेशी सहलीला जाणाऱ्यांसाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत प्रवासी 2023-24 मधील जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातील परदेशी सहलींचे बुकिंग करून हजारो रुपये वाचवू शकतात. ते कसे, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
मान्सून स्पेशल ऑफर नक्की काय आहे?
1 जुलै 2023 पासून सर्व विदेशी सहलींवर भारत सरकार तर्फे 20 टक्के TCS आकारण्यात येणार आहे. मात्र 30 जून पूर्वी प्रवाशांनी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमधील विदेशी सहलींचे बुकिंग करून संपूर्ण सहल खर्च भरला, तर 15 टक्क्यांची TCS करामध्ये सवलत केसरीकडून मिळणार आहे. केवळ 5 टक्के TCS कर भरून प्रवाशांना विदेश यात्रा करता येणार आहे. ज्यामुळे त्यांचे हजारो-लाखो रुपये वाचतील.
कोणत्या टूर पॅकेजसाठी किती रक्कम मोजावी लागेल?
केसरीकडून देण्यात येत असलेल्या मान्सून स्पेशल ऑफर अंतर्गत युरोप टूर 1.5 लाखांपासून सुरू होते. तर ऑस्ट्रेलिया 2.90 लाख, अमेरिका 1.79 लाख, दुबई 68 हजार, जपान 1.80 लाख, आईसलॅंड 3.85 लाख, भूतान 97 हजार, मॉरिशस 99 हजार, नेपाळ 59 हजार आणि साऊथ ईस्ट एशिया 77 हजार रुपयांपासून सुरु होत आहे. या रकमेत इतर चार्जेस कंपनीकडून वाढू शकतात. त्यासंदर्भात तुम्ही कंपनीशी बोलू शकता.
अधिक माहितीसाठी...
केसरी टूर्सचे प्रत्येक शहरात एक ऑफिस आहे. ज्याठिकाणी जाऊन तुम्ही या विदेशी सहलीचे बुकिंग करू शकता. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 च्या दरम्यान विदेशी सहलीचे बुकिंग करता येईल. तसेच अधिक माहितीसाठी 1800221100 या क्रमांकावर संपर्क साधता येईल किंवा Kesari.com या अधिकृत वेबसाईटला भेट देता येईल .
टीसीएस कराबद्दल जाणून घ्या
उत्पन्नाच्या स्त्रोतावर टीसीएस कापला जातो. विशिष्ट प्रकारच्या वस्तूंच्या व्यवहारावर हा कर लावला जातो. जसे की दारू, खनिजे, विदेशी सहली इत्यादी. खरेदीदाराकडून टीसीएस गोळा करून तो सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी ही संबंधित मालाची किंवा सेवेची विक्री करणाऱ्या व्यक्तीची असते. म्हणजेच त्या विक्रेत्याची जबाबदारी असते. आयकर कायद्याच्या कलम 206C (1) नुसार, व्यावसायिक कारणांसाठी काही वस्तूंच्या विक्रीवरच हा कर लावण्यात येतो.