Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Onam Festival Bonus : केरळमध्ये मनरेगा कर्मचाऱ्यांना 1000, तर लॉटरी कर्मचाऱ्यांना 6000 रुपयांचा बोनस

onam Festival

ओणम या सणासाठी केरळ सरकारकडून बहुतांश कर्मचाऱ्यांना ओणम भत्ता अथवा बोनस देण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ओणम सणाचा बोनस म्हणून 4000 रुपये देण्यात आले आहेत. तर बोनससाठी पात्र नसलेल्या कर्मचाऱ्यांसाठी 2750 रुपये ओणम सण भत्ता जाहीर करण्यात आला आहे. केरळमधील एकूण जवळपास 13 लाख कर्मचारी ओणमच्या विशेष भत्ते आणि बोनससाठी पात्र ठरले आहेत.

दक्षिण भारतात सर्वत्र आज मोठ्या प्रमाणात ओणम सण उत्सवात साजरा केला जात आहे.ओणम हा प्रामुख्याने केरळ राज्याचा महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. केरळमध्ये सह दक्षिण भारतातील काही राज्यात हा सण तब्बल 10 दिवस साजरा केला जातो. मल्याळम भाषिकांची दिवाळी म्हणून ओळख असलेल्या या ओणम सणानिमित्त केरळ सरकारकडून तेथील कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील लाभार्थी आणि लॉटरी व्यवसायात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून बोनस देण्यात आला आहे.

मनरेगाच्या कामगारांना 1000 रुपये

ओणम सणानिमित्त (Onam Festival) केरळ राज्य सरकारने  राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) आणि केरळ सरकारची अय्याकंकली शहरी रोजगार हमी योजनेच्या (AUEGS) या योजनेतील कर्मचाऱ्यांना 1000 रुपये ओणम बोनस (Bonus for Onam) जाहीर केला आहे. मात्र हा बोनस ज्या कर्मचाऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून 100 दिवसांचे काम पूर्ण केले आहे. त्यांनाच हा बोनस दिला जाणार आहे. दरम्यान, केरळातील सुमारे 4.6 लाख कामगारांना या ओणम बोनससाठी पात्र ठरले आहेत. यासाठी केरळ सरकारने 46 कोटी निधीची तरतूद केली आहे.

लॉटरी क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही बोनस

याच बरोबर ओणम या सणानिमित्त केरळ सरकारने  केरळ राज्य लॉटरीच्या तब्बल 45,000 एजंट आणि लॉटरी विक्रेत्यांनाही 6000 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे. यासाठी केरळ राज्य लॉटरी एजंट्स आणि सेलर्स वेल्फेअर फंड बोर्डाच्या वतीने 24.04 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी दिली आहे.

एकूण 13 लाख कर्मचाऱ्यांना बोनस, ओणम भत्ता