Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PUC Certificate: जर तुमच्याकडेही गाडी असेल, तर जवळ ठेवा PUC सर्टिफिकेट; अन्यथा भरावा लागेल इतका दंड !

PUC Certificate

Image Source : www.rto.care.com

PUC Certificate: जर तुम्हीही गाडी घेऊन घराबाहेर पडणार असाल, तर केवळ लायसन्स घेऊन घराबाहेर न पडता PUC सर्टिफिकेटही सोबत ठेवा, अन्यथा दंडाची रक्कम खिशात राखून ठेवा. PUC सर्टिफिकेट नसेल, तर साधारण किती दंड भरावा लागतो? हे सर्टिफिकेट कुठे मिळतं, ही माहिती जाणून घ्या.

हल्ली आपण सगळेच वाहतुकीसाठी वेगवेगळी वाहने वापरतो. कुणाकडे दुचाकी, तर कोणाकडे चारचाकी वाहन पाहायला मिळते. पण ही वाहनं चालवण्यासाठी आपल्याकडे काही कागदपत्रं असणं गरजेचं असतं. भारतीय मोटर वाहन अधिनियम विभागाने यासंदर्भातील वेगवेगळे नियम तयार केले आहेत. अलीकडे अनेकजण वाहतुकीसाठी खाजगी गाड्या वापरत आहेत. त्यामुळे खासगी गाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात भर पडल्याचे पाहायला मिळत आहे. वाढत्या गाड्यांच्या संख्येमुळे प्रदूषण ही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मोटर वाहन अधिनियम विभागाकडून वेळोवेळी वाहन चालकांना PUC करण्याची सूचना केली जाते.

मात्र यापुढे तुमच्याकडे PUC सर्टिफिकेट नसेल, तर तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. मोटर वाहन अधिनियम 2019 मध्ये आल्यानंतर वाहनापासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी खूप काळजी घेतली जात आहे. अशातच PUC सर्टिफिकेट म्हणजेच पोलुशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट (Pollution Under Control Certificate) गाड्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. याचा उद्देश्य वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केला जातो. PUC सर्टिफिकेट देताना गाडी प्रमाणापेक्षा जास्त प्रदूषण तर करत नाही ना? हे तपासले जाते. गाडीची संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच  PUC सर्टिफिकेट देण्यात येते.

PUC सर्टिफिकेट नसेल, तर किती भरावा लागेल दंड?

नवीन गाडीची खरेदी केल्यांनतर, PUC सर्टिफिकेट गाडीसोबत दिले जाते. ज्याची वॅलिडीटी साधारण एका वर्षापर्यंत मर्यादित असते. एका वर्षानंतर वाहन चालकाला पुन्हा एकदा गाडीची PUC तपासणी करावी लागते आणि त्यानंतर पुन्हा नवीन सर्टिफिकेट मिळवावे लागते. या नवीन सर्टिफिकेटची वॅलिडिटी 3 ते 6 महिन्यांपर्यंतची असते. या तपासणीसाठी साधारणपणे 60 ते 100 रुपये खर्च येतो.

महत्त्वाचं म्हणजे एका राज्याचे PUC सर्टिफिकेट दूसऱ्या राज्यात वैध मानले जाते. त्यामुळे यापुढे तुम्ही गाडी घेऊन बाहेत जाणार असाल, तर लायसन्स सोबत PUC सर्टिफिकेटही जवळ बाळगावे लागेल. अन्यथा 10 हजार रुपयापर्यंतचा दंड तुम्हाला आकारण्यात येईल.

PUC सर्टिफिकेट कसं काढायचं?

जर तुम्हालाही तुमच्या गाडीचे PUC सर्टिफिकेट काढायचे असेल, तर तुम्हाला ज्या ठिकाणी पेट्रोल पंप असेल, अशा ठिकाणाला भेट द्यावी लागेल. देशातील प्रत्येक राज्याच्या पेट्रोल पंपावर प्रदूषण केंद्र उभारण्यात आले आहे. हे सेंटर त्या राज्यातील ट्रान्सपोर्ट विभागाचे अधिकृत सेंटर म्हणून ओळखले जाते.

या PUC सर्टिफिकेटवर सीरियल नंबर, गाडीच्या नंबर देण्यात आलेला असतो. याशिवाय ज्या दिवशी गाडीची तपासणी करण्यात आलेली असते, त्या दिवशीची तारीख, एक्सपायरी डेट यासारख्या गोष्टी नमूद केलेल्या असतात.

PUC चाचणी कशी केली जाते?

ही चाचणी अगदी काही मिनिटात पूर्ण होते. त्यासाठी प्रदूषण तपासणी केंद्रावर संगणकाला गॅस अॅनालायझर जोडण्यात आलेले असते. या संगणकाला कॅमेरा आणि प्रिंटरही कनेक्टेड असतो. वाहनाच्या सायलेन्सरमध्ये गॅस अॅनालायझर ठेवला जातो आणि वाहन चालू केले जाते. हे गॅस अॅनालायझर वाहनातून बाहेर पडणारे प्रदूषण तपासते आणि डेटा संगणकावर पाठवते. त्याच वेळी, कॅमेरा वाहनाच्या लायसन्स प्लेटचा फोटो काढतो. गाडी स्टँडर्डपेक्षा कमी प्रदूषण करत असेल, तर PUC प्रमाणपत्र दिले जाते. या तपासणी प्रक्रियेत पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये काही फरक आहेत. 

पेट्रोल वाहन: पेट्रोल वाहनांसाठी वाहनाचा एक्सीलेटर न दाबता फक्त एकदाच रीडिंग घेण्यात येते. 

डिझेल वाहन: डिझेल वाहनासाठी, वाहनाचा एक्सीलेटर पूर्णपणे दाबला जातो आणि धुराच्या प्रदूषणाचे रीडिंग घेतले जाते. असे चार ते पाच वेळा करून सरासरी प्रमाण काढले जाते.