जेएसडब्ल्यू समुहाचे मुख्य फायनान्स अधिकारी शेषगिरी राव यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, जिंदाल ग्रुपमधील एका गटाने यापूर्वी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणाऱ्या स्कीमची तपासणी केली होती. तसेच त्याची संपूर्ण माहिती घेऊन कंपनी त्यावर पूर्णत: सकारात्मक विचार करत आहे.
कंपनी सध्या चारचाकी वाहनांचे उत्पादन करण्याचा विचार करत असल्याचे राव यांनी सांगितले. हा प्रकल्प कुठे उभारला जाणार आहे. त्याबाबतची अधिक माहिती विचारली असता यावर कंपनीकडून निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीने ईव्हीचे प्रोडक्शन सुरू करण्याबाबत टाईमलाईन तयार केली आहे. या टाईमलाईनची योग्य पद्धतीने अंमलबजावणी सुरू आहे. प्रोडक्शन सुरू करण्याबाबतचा निर्णय या टाईमलाईनवर आधारित घेतला जाईल.
जेएसडब्ल्यू ग्रुपचा भाग असलेली जेएसडब्ल्यू स्टील कंपनी ही तामिळनाडूतील सालेम येथे प्रत्येक वर्षाला दहा लाख टन स्टीलचे प्रोडक्शन घेते. या प्रकल्पात कंपनी ऑटो-ग्रेड स्टीलची निर्मिती करते. तसेच कंपनी इतर ईव्ही गाड्यांची निर्मिती करणाऱ्या ऑटोमोबाईल कंपन्यांना उच्च प्रतीच्या स्टीलचा पुरवठा करते. याशिवाय कंपनीची ऊर्जा, सिमेंट, पेंट्स, व्हेंटर कॅपिटल आणि स्पोर्ट्स या क्षेत्रांमध्ये सुमारे 22 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आहे.
थोडक्यात पण महत्त्वाचे
- पार्थ जिंदाल यांनी बोर्ड ऑफ मेंबर जॉईंट केल्यानंतर जेएसडब्ल्यू एनर्जीचा दुसऱ्या तिमाहीत एकूण 37 टक्क्यांनी म्हणजे 466 कोटी रुपयांची वाढ झाली.
- जेएसडब्ल्यू एनर्जीच्या भागधारकांना आशा आहे की, पार्थ जिंदाल हे कंपनीच्या संचालकपदी विराजमान होतील.
- जेएसडब्ल्यू सिमेंट कंपनीने MUFG बॅंकेकडून 400 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे.