गहू आणि ज्वारीची तुलना केली तर आधीच्या काळात गहू दुर्मिळ होता, आता परिस्थिति उलट आहे आता ज्वारी दुर्मिळ आहे. रब्बी पिकांमध्ये हरभरा आणि गहू याचे पीक शेतकरी घेतात म्हणून गव्हाचा साठा आहे. गव्हाचे दर सध्या 3100 ते 3800 रुपये प्रती क्विंटल आहेत. या तुलनेत ज्वारी 5600 रुपयांवर गेली आहे. विविध प्रकारच्या ज्वारीचे दर पुढीलप्रमाणे,
ज्वारीचा प्रकार | दर |
ज्वारी मालदांडी 1 | 5000 ते 5600 |
ज्वारी मालदांडी 2 | 4500 ते 5000 |
ज्वारी वसंत 9 | 3300 ते 3500 |
ज्वारी दूरी | 3500 ते 4000 |
Table of contents [Show]
गव्हाच्या तुलनेत ज्वारीची आवक कमी (Low Procurement of Jowar)
गव्हाचे पीक ज्वारीच्या तुलनेत भरपूर दिसून येते. त्यामुळे गव्हाची आवक जास्त आहे आणि ज्वारीची कमी. कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे यांच्या अहवालानुसार, ज्वारीची आवक जर 526 क्विंटल असेल तर त्याचवेळी गव्हाची आवक 2093 क्विंटल असते. ज्वारीच्या तुलनेत गहू तीन पट आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे गहू ज्वारी घेतले तरीही त्यात ज्वारीची आवक कमीच दिसून येते.
ज्वारीचे वाढते दर
मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी ज्वारीची आवक अधिकच कमी आहे, परतीच्या पावसामुळे ज्वारीचे नुकसान झाले त्यामुळे ज्वारीचा दर्जा सुद्धा कमी राहणार आहे, तरीही ज्वारीचे भाव वाढतच आहे. 35 ते 52 रुपये किलो ज्वारीचे दर आहेत. विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार गेल्या चार महिन्यात ज्वारी 40 टक्क्यांनी महागली आहे. सर्वात आधी गावरान ज्वारीची पेरणी केली जात असे आणि काही दिवसानंतर मग संकरीत ज्वारी, आता तर कमीत कमी प्रमाणात संकरीत ज्वारीची पेरणी केली जात आहे. ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना भाववाढीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
हॉटेलमध्ये ज्वारीची भाकरी महागली (Jowar Roti Price Rise in Hotel)
काही वर्षांपूर्वी ज्वारीची भाकरी सर्वांच्या परिचयाची होती, पण आता पोळी समोर भाकरी मागे पडली. हॉटेलमध्ये ज्वारीची भाकरी 20 ते 30 रुपये प्रती नग आहे आणि पोळी 5 ते 15 रुपये. त्यामुळे घरगुती जेवणात दररोज मिळणारी भाकरी आता हॉटेलमध्ये 20 ते 30 रुपये मोजून घ्यावी लागणार आहे. बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू या पैकी बाजरी आणि ज्वारीच्या दरात वाढ झाली आहे. व्यापाऱ्यांच्या सांगण्यानुसार जानेवारीमध्ये बाजरी आणि ज्वारीच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. नवीन माल येण्यास सुरवात झाली की मालाच्या भावात घसरण होते.
ज्वारीची मागणी वाढली (Demand of Jowar Rise)
ज्वारी पचायला हलकी असल्याने ज्वारीची मागणी वाढली आहे. रासायनिक पदार्थ खाण्यात आल्याने अनेक प्रकारचे आजार निर्माण झाल्याने आता प्रत्येकाचा कल सेंद्रिय आणि शरीराला सूट होईल असे अन्न खाण्याकडे आहे. त्यामुळे ज्वारीची मागणी वाढली आणि तिच्या दरातसुद्धा वाढ झालेली दिसून येते.