Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Joint Home Loan: जाॅईंट गृहकर्ज घेताय? हे आहेत फायदे

Joint Home Loan: जाॅईंट गृहकर्ज घेताय? हे आहेत फायदे

घर घेणं म्हणजे आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा असतो. पण, तो पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. प्रसंगी गृहकर्ज ही घ्यावे लागू शकते. कारण, घराच्या किमती खूप वाढून आहेत. त्यामुळे, गृहकर्ज घेतल्यास ते फेडायला 20-30 वर्ष लागू शकतात. यासाठी घर घेण्याआधीच त्याचे प्लॅनिंग करणे गरजे आहे. म्हणूनच आपण आज जाॅईंट (संयुक्त) गृहकर्जाचे फायदे जाणून घेणार आहोत.

Joint Home Loan: घर घ्यायच्याआधी प्लॅनिंग न करता, घर घ्यायच्या विचारात असल्यास, थांबा. कारण, विना प्लॅनिंग तुम्ही अडचणीत येऊ शकता. मार्केटमध्ये सध्या हव्या त्या बजेटमध्ये तुम्ही घर घेऊ शकता. मात्र, सध्याचे व्याजदर पाहता ते एकट्याला थोडं अवघड जाऊ शकते. तेच, कुटुंबातील कमावत्या सदस्याने हातभार लावल्यास, गृहकर्ज मिळवणे सोपे होऊ शकते. तसेच, गृहकर्जाची रक्कमही वाढू शकते. त्यामुळे यात जसा फायदा आहे तशीच रिस्कही आहे. तेव्हा आपल्याला दोन्ही गोष्टी समजून गृहकर्जासाठी काय सहज राहिल हे पाहावे लागणार आहे.

जाॅईंट गृहकर्जाचे फायदे

तुम्ही जाॅईंट गृहकर्जाच्या अर्जासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्याची निवड केल्यास, बँकांकडून गृहकर्जाच्या रकमेत वाढ होऊ शकते. मात्र, दोन्ही कर्जदारांना यासाठी बॅंकेच्या मूलभूत आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. जसे की, त्यांचे उत्पन्न किंवा कमाई नियमित असल्याची दाखवावी लागू शकते. त्याचबरोबर तुमच्या सोबत गृहकर्जात सहभागी असलेल्या सदस्याचा क्रेडिट स्कोअर चांगला असल्यास, तुमचे गृहकर्ज त्वरित मंजूर होऊ शकते.

तसेच, जाॅईंट गृहकर्जासह, अर्ज करणाऱ्यांना इन्कम टॅक्स अ‍ॅक्ट 1961 च्या सेक्शन 24 आणि सेक्शन 80C अंतर्गत उपलब्ध कर कपातींमधून वैयक्तिकरित्या लाभ घेता येतो. त्यामुळे  हा अर्ज केल्यास दोघांनाही कर सवलत मिळते. याशिवाय तुम्ही जर जाॅईंट गृहकर्जासाठी सोबत आई किंवा पत्नीची निवड केल्यास, तुम्हाला अजून लाभ मिळू शकतो. कारण, बहुतेक बॅंका महिला ग्राहकांना कमी व्याजदरावर लोन देतात.

जाॅईंट गृहकर्जाची रिस्क

जॉईंट गृहकर्जासाठी अर्ज करताना फक्त उच्च क्रेडिट स्कोअरचा फायदा होतो. जर क्रेडिट स्कोअर चांगला नसल्यास, अर्ज फेटाळण्याची शक्यताही वाढू शकते. त्यामुळे, जाॅईंट गृहकर्जासाठी सोबती निवडताना, त्याचा क्रेडिट स्कोअर किंवा लोन/EMI हिस्ट्री जाणून घ्या. त्यानंतरच त्याची निवड करा. याबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमचा जोडीदार आर्थिकदृष्ट्या सक्षम आही की नाही हे देखील पाहणे आवश्यक आहे. कारण, एखादे आर्थिक संकट आल्यास, दोघांपैकी एकावरच ताण येणार आहे. त्यामुळे त्या गोष्टीचे मॅनेजमेंट ही आधीच करावे लागणार आहे.

तसेच, असा सोबती निवडा जेणेकरुन भविष्यात वाद होणार नाही. कारण, तुमचा जर जाॅईंट खातेदारासह वाद झाल्यास तुम्हाला मालमत्ता विकायला जड जाऊ शकते. त्यामुळे ही गोष्ट विचारात घेऊनच. तुमचा जाॅईंट खात्याचा सोबती निवडा. तुम्हाला जर योग्य प्लॅनिंगनुसार घर घ्यायचे असल्यास, जाॅईंट गृहकर्जाचा पर्याय चुकवू नका. कारण, यामुळे तुम्हाला बरीच सवलत मिळेल. तसेच EMI चा जास्त ताण राहणार नाही.