जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) ही अमेरिकेतली एक फार्मास्युटिकल कंपनी आहे. न्यू जर्सी इथल्या जॉन्सन बेबी पावडरमुळे (Baby powder) कर्करोगाची अनेक प्रकरणं समोर आली. आता त्याचा निपटारा करण्यासाठी कंपनीनं पाऊल उचललंय. मागच्या काही वर्षातले हे खटले मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून 8.9 अब्ज डॉलरच्या (जवळपास 73 हजार कोटी) सेटलमेंटचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. यासंबंधी कोर्टात लढा देऊ आणि योग्य निर्णय घेऊ. न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर नुकसानभरपाईची प्रक्रिया केली जाईल, असं कंपनीनं म्हटलं आहे.
Table of contents [Show]
कंपनीकडून चुकीची कबुली नाही
कंपनीनं मात्र चुकीची कबुली अद्याप दिलेली नाही. पावडरची विक्री थांबविल्यामुळे होत असलेल्या नुकसानीनंतर कंपनी ही भरपाई देण्यास तयार झालीय. अनेक तक्रारीनंतर 2020मध्ये युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये कंपनीचं बेबी पावडर प्रॉडक्टच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे कंपनीचं आर्थिक नुकसान झालं. कंपनीविरोधात अनेक खटलेही दाखल झाले. मात्र कंपनीविरोधातले दावे खोटे आहेत. आम्हाला आता या खटल्याच्या त्रासातून बाहेर पडायचं आहे, असं कंपनीनं म्हटलंय.
Johnson & Johnson has agreed to pay $8.9 billion to settle tens of thousands of lawsuits alleging that talc in its iconic Baby Powder and other products caused cancer, the company said. The amount dwarfs J&J’s original offer of $2 billion https://t.co/79KtFJlPOB
— Reuters (@Reuters) April 5, 2023
2 बिलियन डॉलर सेटलमेंट ऑफर
जॉन्सन अँड जॉन्सनचे खटल्यातले उपाध्यक्ष एरिक हास यांनी एक निवेदन जारी केलं. कंपनीचा विश्वास आहे, की हे सर्व दावे खोटे आहेत आणि त्यात वैज्ञानिक तथ्यांचा अभाव आहे. 25 वर्षातील हजारो दावेदारांना जॉन्सन अॅण्ड जॉन्सन आणि उपकंपनी एलटीएल मॅनेजमेंट एलएलसीद्वारे 8.9 अब्ज देतील. सुमारे 60,000 दावेदारांनी या प्रस्तावास सहमती दर्शवली आहे. एलटीएलचा समावेश असलेला मागील सेटलमेंट अपील कोर्टानं नाकारला होता आणि कोर्टानं आता नवीन एलटीएल दिवाळखोरी दाखल करणं आणि सेटलमेंट मंजूर करणं आवश्यक आहे. या पावडरमुळे कर्करोग झाल्याच्या आरोपाला उत्तर म्हणून जॉन्सन अँड जॉन्सननं यापूर्वी 2 बिलियन डॉलर सेटलमेंट ऑफर केली होती.
एक संदेश
जवळपास 70,000 लोकांनी कंपनीविरुद्ध दावा केला होता, त्यांच्या लढ्याला यश आलं आहे. ही सेटलमेंट अशा हजारो महिलांचा दाखला आहे, ज्यांनी स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी कर्करोग आणि न्यायालयीन प्रणाली या दोन्हींशी लढा दिला आहे, असं फिर्यादींच्या लॉ फर्म वॅट्स गुएरा एलएलसीच्या अॅलिसिया ओनील यांनी सांगितलं. या महिला सशक्त आहेत. आता कोणत्याही महिलेला अशाप्रकारच्या धोक्याचा सामना करावा लागणार नाही, हा संदेश या माध्यमातून गेल्याचं त्या म्हणाल्या. तर हे सर्व लोक नुकसानभरपाईस पात्र असल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केलं.
एस्बेस्टोस असल्याचाही काही खटल्यांमध्ये आरोप
जॉन्सन बेबी पावडर किंवा पूर्वीचे जॉन्सन अॅण्ड जॉन्सन उत्पादन, शॉवर टू शॉवर, वर्षानुवर्षे वापरल्यानंतर गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचं सांगणाऱ्या महिलांनी खटले दाखल केले होते. पावडरमध्ये एस्बेस्टोस असल्याचाही काही खटल्यांमध्ये आरोप करण्यात आलाय. यामुळे मेसोथेलियोमा नावाचा दुर्मीळ प्रकाराच्या कर्करोगाचं निदान होतं. मात्र आपल्या टॅल्क उत्पादनांमध्ये एस्बेस्टोस नाही, असा कंपनीनं वारंवार दावा केला. 2018साली जवळपास 22 महिलांना कर्करोग झाल्याचं निदान झाल्यानंतर यासंबंधीच्या खटल्यात कोर्टानं कंपनीचा बाजू ऐकून घेण्यास नकार दिला. त्यानंतर कंपनीनं 2021मध्ये संबंधित पीडितांना नुकसानभरपाई दिली. कंपनीनं 22 महिलांना टॅल्क पावडरमुळे गर्भाशयाचा कर्करोग झाल्याचे 2018 मधून $2.1 बिलियनचे ज्युरी पुरस्कार दिले. यूएस सुप्रीम कोर्टाने त्या निकालाचे अपील ऐकण्यास नकार दिल्यानंतर J&J ने पेमेंट केले.
दिवाळखोरीसंबंधी संरक्षण नाहीच
दिवाळखोरीसंबंधीचं संरक्षण मिळवण्याचा कंपनीचा प्रयत्न होता. मात्र वर्षानुवर्षांच्या खटल्यांनंतर आता न्यायालयानं कंपनीची सर्व बाजू ऐकून घेतली आहे. आता कंपनीला 8.9 अब्ज नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अशाप्रकारची नुकसानभरपाई ही अमेरिकेतल्या मोठ्या नुकसानभरपाई प्रकरणांमधली एक मानली जात आहे. दुसरीकडे जॉन्सन बेबी पावडरची विक्री थांबवली असून त्याऐवजी बेबी पावडरची कॉनस्टार्च आधारित एडिशन विकली जात असल्याची माहिती मिळत आहे.