Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

LinkedIn Job Scam: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसोबत होतेय फसवणूक, लिंक्डइनवरून नोकरी शोधत असाल तर सावधान…

LinkedIn Job Scam

रोजगाराच्या शोधात अनेक लोक LinkedIn वर येऊन नाव नोंदणी करतात आणि जॉबसाठी अप्लाय करतात हे सायबर चोरांच्या लक्षात आले आहे. हेच लक्षात घेऊन सायबर चोर लिंक्डइनवर एखाद्या कंपनीच्या नावे बनावट प्रोफाइल तयार करतात. हे प्रोफाइल मूळ कंपनीच्या प्रोफाइलशी साधर्म्य दाखवेल असे बनवले जाते. त्याद्वारे युवकांची आर्थिक फसवणूक केली जाते.

लिंक्डइन हे नोकरी शोधणाऱ्यांसाठी आजकाल एक आवडते ठिकाण बनले आहे. प्रोफेशन ओळख आणि पोर्टफोलियो बनवण्यासाठी आणि त्या माध्यमातून रोजगाराच्या नवनवीन संधी शोधण्यासाठी होतकरू विद्यार्थी, तरुण या वेबसाईटवर येऊन जॉब सर्च करत असतात.

अनेकवेळा तुम्ही तुमच्या आवडीच्या जॉबसाठी अप्लाय करता आणि त्यानंतर सदर कंपनीकडून तुम्हांला मेल किंवा कॉल येतो आणि तुमची जुजबी माहिती विचारली जाते. त्यांनतर तुम्हांला मुलाखत कुठे आणि कधी असेल याची माहिती दिली जाते. त्यानुसार तुम्ही ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या ठिकाणी पोहोचता. दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीला पोहोचल्यानंतर तुम्हांला आढळतं की अशी कुठलीही कंपनी त्या जागेवर अस्तित्वात नाही. तुम्ही जॉब मिळावा म्हणून कंपनीमध्ये कर्मचारी भरती करत असलेल्या एचआरला ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून काही रक्कम देखील आगाऊ पाठवलेली असते. आता मात्र तुमची फसवणूक झालीये हे तुमच्या लक्षात येतं.

असं प्रत्यक्षपणे जरी तुमच्यासोबत घडलेलं नसलं तरी असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासोबत अशाप्रकारे लिंक्डइनच्या माध्यमातून फसवणूक झालीये. लिंक्डइनवर सायबर चोरांच्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत ज्या लोकांना नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवतात आणि त्यांची फसवणूक करतात. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे.

नॉर्डलेयरने (NordLayer) याबाबत एक अहवाल जारी केला आहे. त्यानुसार, या वर्षी जगभरातील 56 टक्के कंपन्यांना LinkedIn वर किमान एका घोटाळ्याचा सामना करावा लागला आहे. अहवालात कुणा कंपनीच्या नावे बनावट जॉब ऑफरचे आमिष दाखवून फसवणूक होण्याचे प्रमाण 48% आहे असे म्हटले आहे. नॉर्डलेयरच्या अहवालानुसार लिंक्डइनवर  117 लोक नोकरीचे अर्ज पाठवतात. नेमका याचाच फायदा सायबर चोर घेत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

कशी होतेय फसवणूक?

रोजगाराच्या शोधात अनेक लोक  LinkedIn वर येऊन नाव नोंदणी करतात आणि जॉबसाठी अप्लाय करतात हे सायबर चोरांच्या लक्षात आले आहे. हेच लक्षात घेऊन सायबर चोर लिंक्डइनवर एखाद्या कंपनीच्या नावे बनावट प्रोफाइल तयार करतात. हे प्रोफाइल मूळ कंपनीच्या प्रोफाइलशी साधर्म्य दाखवेल असे बनवले जाते.  या बनावट नोकऱ्यांना खरे समजून लोक त्याला बळी पडतात आणि त्यांची वैयक्तिक माहिती LinkedIn वर देतात. त्यांनतर त्यांना कुणी व्यक्ती फोन करतो आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळवून देऊ असे आमिष दाखवतो. त्या बदल्यात ही व्यक्ती नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवाराकडून ‘प्रोसेसिंग फी’च्या नावाखाली पैसे मागतो. चांगल्या पगाराची नोकरी हवी म्हणून काही लोक पैसे देखील देतात. पैसे मिळाल्यानंतर जॉब मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक स्वीच ऑफ यायला लागतो. याचाच अर्थ, नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक झालेली असते.

अशा प्रकारच्या फसवणुकीला मोठमोठ्या कंपन्या बळी पडल्या आहेत असे सदर अहवालात म्हटले आहे. फसवणूक झाल्यानंतर जेव्हा उमेदवारांनी मूळ कंपनीशी संपर्क साधला तेव्हा असे प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. 

वेळीच सावध व्हा!

अशा प्रकारे Linkedin वर तुमची फसवणूक होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही वेळीच सावध व्हायला हवे. हे लक्षात ठेवा की कुठलीही प्रतिष्ठित कंपनी वैयक्तिक मेल आयडीवरून तुमच्याशी संपर्क साधणार नाही. कंपनीच्या अधिकृत मेल आयडीवरून जर मेल आला तरच त्याला उत्तर द्या.

तसेच गलेलठ्ठ पगाराच्या हव्यासापोटी कुणाशीही आर्थिक व्यवहार करू नका. पैसे घेऊन कुणीही तुम्हांला विश्वासदर्शक नोकरी देणार नाही. तसेच नोकरीबद्दल माहिती देणाऱ्या व्यक्तीला तुमचे वैयक्तिक तपशील देऊ नका.  क्रेडिट-डेबिट कार्डची माहिती,  UPI संबंधित माहिती तर देऊच नका.

मुख्य म्हणजे LinkedIn वर येणाऱ्या जॉब ऑफरबद्दल कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे तशी काही जाहिरात आहे का हे चेक करा. शक्यतो कंपनीच्या अधिकृत  वेबसाईटवरूनच जॉबसाठी अप्लाय करा.