Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

JioMart : जिओ मार्टने बंद केली क्विक डिलिव्हरी सेवा

JioMart

Image Source : www.thekitchn.com

रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्ट (JioMart) ने आपली क्विक कॉमर्स ग्रोसरी डिलीव्हरी सेवा जिओ मार्ट एक्स्प्रेस (JioMart Express) बंद केली आहे. हा निर्णय का घेण्यात आला ते पाहूया.

रिलायन्स रिटेलच्या जिओ मार्ट (JioMart) ने आपली क्विक कॉमर्स ग्रोसरी डिलीव्हरी सेवा जिओ मार्ट एक्स्प्रेस (JioMart Express) बंद केली आहे. कंपनीने गेल्या वर्षी मार्चमध्ये ही सेवा सुरू केली होती आणि यामध्ये ग्राहकांना 90 मिनिटांत माल पोहोचवला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही सेवा बंद करण्यात आली आहे. वापरकर्ते Google Play Store वरून JioMart Express अॅप डाउनलोड करू शकत नाहीत. तसेच त्याची वेबसाइट देखील सक्रिय नाही. ते डाउनलोड केल्यावर, वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवर जिओमार्ट वापरून पाहण्यास सांगितले जात आहे. व्हॉट्सअॅपद्वारे JioMart वर ऑर्डर बुक केल्यावर, डिलिव्हरीला अनेक तास किंवा एक दिवस लागत आहे. म्हणजेच जिओमार्टवर आता जलद सेवा वितरण बंद झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

ही सेवा सर्वप्रथम नवी मुंबईत सुरू करण्यात आली

याचा अर्थ असा की Quick Delivery Service Express यापुढे Jio Mart वर उपलब्ध असणार नाही. व्हॉट्सअॅपद्वारे जिओ मार्टची डिलिव्हरी सेवा ही मेटा इंक आणि रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म यांच्यातील भागीदारी आहे. जिओ मार्ट एक्स्प्रेस पहिल्यांदा नवी मुंबई आणि आसपासच्या भागात सुरू करण्यात आली होती आणि कंपनीने या योजनेचा 200 शहरांमध्ये विस्तार करण्याची योजना आखण्यात आली होती. इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना सूत्रांनी सांगितले की, रिलायन्स रिटेलला आता या प्रकारच्या व्यवसायात यायचे नाही. गेल्या वर्षी दिसलेल्या तेजीनंतर कंपनीने एक्स्प्रेस डिलिव्हरीचा व्यवसाय चालवण्याचा प्रयोग केला, परंतु तो पुढे चालवला जात नाही आहे.

क्वीक डिलिव्हरीमध्ये स्पर्धा

ईशा अंबानीच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की JioMart एक्सप्रेस हा एक पायलट प्रकल्प होता जो निवडक वापरकर्त्यांसाठी सुरू करण्यात आला होता. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, किराणा मालातील कंपनीचा डिजिटल कॉमर्स व्यवसाय विविध स्वरूपात सुरू राहील. JioMart सध्या 350 हून अधिक शहरांमध्ये आहे. त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप आणि मिल्कबास्केटच्या माध्यमातून जिओमार्टची सेवा 35 हून अधिक शहरांमध्ये उपलब्ध आहे. या सेवांचा विस्तार करण्यात येत आहे. गुंतवणूकदार क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बारीक लक्ष ठेवून आहेत. याचे कारण त्यात मोठी रोकड टाकली जात आहे. क्वीक डिलिव्हरीसाठी अनेक कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. यामध्ये Swiggy's Instamart, Zomato's Blinkit, BigBasket's BB Now आणि Zepto यांचा समावेश आहे. रिलायन्स रिटेलने क्विक कॉमर्स स्टार्टअप डन्झोमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. या कंपनीने गेल्या महिन्यात सुमारे तीन टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. यासोबतच खर्चाला आळा घालण्यासाठी अनेक बदल करण्यात आले. जिओमार्टने एक्स्प्रेससाठी डंझोचा डिलिव्हरी फ्लीट वापरण्याची योजना आखली होती. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

या कंपन्यांनीही बदलली सर्व्हिस

क्विक डिलिव्हरी व्यवसायातील अनेक कंपन्यांना रोखीच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. झोमॅटोचे ब्लिंकिटने त्यांच्या "10-minute delivery वरून "Delivery in minutes" अशी सेवा बदलली आहे. तर स्विगीच्या इन्स्टामार्टनेसुद्धा देखील 15-30 मिनिटांमधील क्विक सर्व्हिस सेवा बदलून काही मिनीटांत सामान अशी सेवा केली आहे.