Reliance Jio ने आपला नवीन लॅपटॉप JioBook Version 2 भारतात लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. भारतीयांच्या गरजा लक्षात ठेऊन रिलायन्सने हा खास लॅपटॉप बाजारात आणला आहे. रिलायन्सचे हे नवे उत्पादन गेम चेंजर ठरू शकते असे बोलले जात आहे.
सध्या लॅपटॉपची मायक्रोसाईट Amazon India वर लाइव्ह झाली आहे. याच साईटवर JioBook Version 2 लॉन्चची तारीख जाहीर करण्यात आली आहे. हा लॅपटॉप नेमका कसा दिसेल हे देखील यावर ग्राहकांना बघता येणार आहे. यावर सदर लॅपटॉपची माहिती देताना 'Your ultimate learning partner' अशी टॅगलाईन वापरण्यात आली आहे. याचाच अर्थ विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन हा लॅपटॉप बनविण्यात आला आहे. देशातील शैक्षणिक व्यवस्थेत होणारे बदल लक्षात घेत रिलायन्सने हे नवे उत्पादन बाजारात आणले आहे.
31 जुलै रोजी भारतात लाँच होणार
Amazon India वर असलेल्या मायक्रोसाइटनुसार, Jio चा नवीन JioBook लॅपटॉप हा येत्या 31 जुलै रोजी भारतात लाँच होणार आहे. वापरण्यास सोपा आणि दिसायला आकर्षक असा हा लॅपटॉप असणार आहे. 4G कनेक्टिव्हिटीसह JioOS ला सपोर्ट करणारा हा लॅपटॉप आहे. यात इनबिल्ट अनेक ॲप्लिकेशन देण्यात आले आहेत. जिओचे स्वतःचे इनहाऊस ॲप्लिकेशन यात देण्यात आले आहेत. JioBook लॅपटॉपमध्ये ऑक्टा-कोर चिपसेट दिला जाणार असून युजर्सला एचडी वेबकॅम आणि ब्लूटूथचा द्खील अनुभव घेता येणार आहे. यासोबतच वाय-फाय कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे. JioBook Version 1 ची किंमत 15,799 रुपये ठरवण्यात आली होती. याच्या तुलनेने JioBook Version 2 किंमत थोडी अधिक असेल परंतु परवडणाऱ्या दरात असेल असे बोलले जात आहे. या लॅपटॉपची किंमत अजून कंपनीने जाहीर केलेली नाही. येत्या 31 जुलैलाच किंमत जाहीर करण्यात येणार आहे.
New #JioBook laptop to launch in India on July 31 on #Amazon, expected to be a entry level laptop.
— TiE (@Techinfoeditor) July 24, 2023
✓support for 4G
✓octa-core processor
✓lightweight design 990g
✓full-day battery
✓streams HD videos
✓Similar old JioBook design #Jio #laptop #launch #news #exposed pic.twitter.com/8RcfoochsH
JioBook Version 2 फीचर्स
या लॅपटॉपमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज दिला गेला आहे. या लॅपटॉपमध्ये युजर्सला 11.6-इंचाचा डिस्प्ले वापरता येणार आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1366 x 768 पिक्सेल इतके आहे. तसेच लॅपटॉपमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर देण्यात आला आहे.लॅपटॉपमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 4जी सिम कार्ड, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, वाय-फाय आणि एचडीएमआय पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक देण्यात आला आहे. याशिवाय, लॅपटॉपला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी 2MP कॅमेरा देखील दिला गेला आहे.