Jio-BP ने बाजारात प्रीमियम डिझेल आणले आहे. सामान्य डीझेलच्या तुलनेत हे डीझेल स्वस्त मिळणार आहे. Jio-BP हा रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (Reliance Industries Limited) आणि ब्रिटिश पेट्रोलियम ऑफ ब्रिटनचा (British Petroleum of Britain) संयुक्त उपक्रम आहे.देशातील वाहतूक क्षेत्रात आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना हा स्वस्त डीझेलचा पर्याय फायद्याचा ठरणार आहे. याचे मुख्य कारण म्हणजे किंमत सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांच्या सामान्य डिझेलपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे.
इंधनाची होईल बचत
जिओ-बीपीने दावा केला आहे की एडिटीव्ह-लेस्ड प्रीमियम डिझेल (Additive-less Premium Diesel) चांगले मायलेज देते आणि या इंधनामुळे प्रति ट्रक 1.1 लाख रुपयांपर्यंत बचत होणार आहे. 1.2 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.
Jio-BP ने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून भारतात हे डीझेल उपलब्ध करून दिले आहे. ज्यामुळे डीझेलच्या किमती तर कमी होईलच, सोबत इंधनाची बचत होऊन गाड्यांचे आयुष्य देखील वाढणार आहे. सामान्य डीझेलच्या तुलनेत प्रीमियम डिझेल स्वस्त मिळत आहे.
प्रीमियम डिझेल मुंबईतील Jio-BP च्या पेट्रोल पंपावर 91.30 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे, तर सामान्य डिझेलची किंमत 92.28 रुपये प्रति लीटर इतकी आहे. प्रीमियम डिझेलमुळे ट्रक चालकांना प्रति वाहन 1.1 लाखांची बचत होणार आहे.
Jio-bp launches new diesel that offers to save Rs 1.1 lakh per truck annually
— ANI Digital (@ani_digital) May 16, 2023
Read @ANI Story | https://t.co/FBXPxSljhv#Jiobp #Diesel #FuelEconomy pic.twitter.com/R9nkSoR1js
ट्रक मालकांचे हित लक्षात घेऊन तयारी
जिओ-बीपीचे कार्यकारी अध्यक्ष हरीश सी. मेहता माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “प्रत्येक ग्राहक आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच जिओ-बीपीने ट्रकचालकांसाठी ही विशेष सुविधा देऊ केली आहे. आम्ही ट्रक ड्रायव्हर्सचा ऑपरेटिंग खर्च चांगल्या प्रकारे जाणून आहोत, कारण इंधनाच्या दरवाढीसागा थेट परिणाम त्यांच्या व्यवसायाच्या कामगिरीवर होत असतो. इंधन कार्यक्षमतेबद्दल आणि इंजिनच्या देखभालक्षमतेबद्दल त्यांची चिंता कमी करण्यासाठी, जिओ-बीपीने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी गेली काही वर्षे काम केले आहे. सर्वोत्तम असे तंत्रज्ञान वापरून जिओ-बीपीने हे एडिटीव्ह-लेस्ड प्रीमियम डिझेल (Additive-less Premium Diesel) विशेषतः भारतीय वाहन, भारतीय रस्ते आणि भारतीय ड्रायव्हिंग परिस्थिती लक्षात घेऊन डिझाइन केले आहे.”
प्रीमियम डिझेलची वैशिष्ट्ये
हे एक उच्च-गुणवत्तेचे डिझेल इंधन आहे ज्यामध्ये कोणतेही ऍडिटीव्ह नसतात. प्रीमियम डिझेलमध्ये अतिरिक्त ऍडिटीव्हची आवश्यकता नसते. हे इंधन उत्कृष्ट कार्यप्रदर्शन आणि स्वच्छता प्रदान करण्याचा दावा करते.
हे डिझेल तुमच्या वाहनाच्या इंजिनची शक्ती पुनर्संचयित आणि कायम राखण्यासाठी मदत करते.या इंधनात ऍडिटीव्ह नसल्यामुळे इंजिनची कार्यक्षमता अधिक असते आणि त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत नाही. यामध्ये एक अँटी-फोम एजंट आहे जो तुमच्या ट्रकला स्वच्छ, जलद आणि सुरक्षित इंधन भरण्यास मदत करतो.
हे ट्रक चालू ठेवताना सतत वापरासह अनियोजित देखभालीचा धोका कमी करण्यास मदत करते. यामुळे घाण साचल्यामुळे महागडे गंभीर इंजिन भाग निकामी होण्याचा धोका कमी होतो. तसेच इंजिनच्या महत्त्वाच्या भागांवर असलेली घाण काढून टाकते आणि संरक्षित करते.