आजही देशातील मोठा वर्ग स्मार्टफोनऐवजी छोटे मोबाईल फोन वापरत आहे. हे लोक 5G च्या जमान्यात अजूनही 2G सेवेचा लाभ घेत आहेत. याच लोकांना केंद्रित करून रिलायन्स जिओ आणि नोकिया कंपनीने 4G फोन कमी किंमतीत भारतीय बाजारपेठेत आणला होता. रिलायन्स जिओचा 'जिओ भारत' आणि नोकिया कंपनीचा 'नोकिया 110' 4G फोन बाजारपेठेत लॉन्च करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना परवडतील असे दर आणि अनेक आधुनिक फीचर्स यामध्ये कंपनीने दिले आहेत. दोन्हीही कंपन्या नामांकित असून त्यांचा भारतीय बाजारपेठेत दबदबा आहे. अशा वेळी कमी बजेटमध्ये तुम्ही यापैकी कोणता फोन खरेदी करू शकता, ते खालील मुद्द्यांच्या आधारे जाणून घ्या.
Table of contents [Show]
‘जिओ भारत’ फोनचे फीचर्स जाणून घ्या
रिलायन्स जिओने 7 जुलै 2023 रोजी भारतात ‘जिओ भारत’ हा नवीन 4G फोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये 177 इंचाचा स्क्रीन देण्यात आला आहे. याशिवाय यामध्ये एसडी कार्ड घालून स्टोरेज 128GB पर्यंत वाढवले जाऊ शकते.
या फोनची बॅटरी 1000mAh क्षमतेची असून यामध्ये ग्राहकांना रिअर कॅमेरा सेटअप, HD कॉलिंग, कॉल रेकॉर्डिंग, UPI पेमेंट, जिओ सिनेमा आणि इतर ओटीटी अँप्सला देखील सपोर्ट करणार आहे.
जिओ भारत फोनमध्ये 23 भाषा निवडल्या जाऊ शकतात. यामध्ये 4G VoLTE, 3.5 MM ऑडिओ जॅक, 0.3MP कॅमेरा, टॉर्च, रेडिओ एफएम यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
हा फोन ग्राहकांना जिओ सिम सोबतच खरेदी करता येणार आहे. थोडक्यात काय, इतर कंपनीन्यांचे सिमकार्ड या मोबाईलमध्ये वापरता येणार नाही.
‘जिओ भारत’ फोनची किंमत जाणून घ्या
जिओ भारत फोन ग्राहकांना 999 रुपयांना संपूर्ण भारतभर खरेदी करता येणार आहे. यातील जिओच्या सिम कार्डवर मासिक 123 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल, तर वार्षिक 1234 रुपयांचा विशेष प्लॅन उपलब्ध आहे.
‘Nokia 110 4G’ फोनचे फीचर्स जाणून घ्या
नामांकित नोकिया कंपनीने भारतात बऱ्याच दिवसांपूर्वी Nokia 110 4G फोन लॉन्च केला होता. या फोनचा डिस्प्ले 1.8 इंचाचा असून TPF LCD प्रकारातील आहे.
या फोनमध्ये 2023 च्या सुरुवातीला UPI पेमेंट सारखे स्मार्ट फीचर्स दिले होते. या फोनच्या QVGA कॅमेरामधून फोटो काढता येऊ शकतात.
नोकियाचा या फोन ब्ल्यूटुथ कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध करून देण्यात येत आहे. या फोनमध्ये कंपनीने टॉर्च, एफएम रेडिओ, कॅमेरा, ऑपेरा मिनी ब्राउझर आणि ठराविक प्री-लोडेड गेम्स मिळणार आहेत.
या फोनमध्ये इअरफोन कनेक्ट करण्यासाठी 3.5 एफएम रेडिओ जॅक आणि मायक्रोएसडी कार्ड सपोर्टसाठी मिळणार आहे. याशिवाय MP3 फीचर्स देखील देण्यात आले आहे. या फोनची बॅटरी 1450mAh क्षमतेची असून तासंतास ती चालते.
‘Nokia 110 4G’ फोनची किंमत जाणून घ्या
नामांकित नोकिया कंपनीचा nokia 110 4G फोन ग्राहकांना 2499 रुपयांना खरेदी करता येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे ग्राहक यामध्ये कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड वापरू शकतात आणि त्यांना हवा असणारा मोबाईल रिचार्ज करू शकतात.
Source: jansatta.com