Jawa 42 Tawang: जावा दुचाकी निर्मिती कंपनीने Jawa 42 Tawang एडिशन ही नवी गाडी लाँच केली आहे. Jawa 42 ही गाडी ग्राहकाच्या पसंतीस उतरल्याने कंपनीने Jawa 42 Tawang ही स्पेशल एडिशन फक्त अरुणाचल प्रदेश आणि इशान्य भारतातील अन्य भागापुरतीच लाँच केली आहे. संपूर्ण भारतामध्येही गाडी कंपनीने लाँच केली नाही. अरुणाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील समृद्ध संस्कृती प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही स्पेशल गाडी कंपनीने बाजारात आणली आहे.
Jawa 42 Tawang Edition च्या फक्त 100 गाड्या कंपनीने तयार केल्या आहेत. या गाडीची भारतीय बाजारातील किंमत 2 लाख 14 हजार रुपये आहे. Jawa 42 या गाडीपेक्षा युनिक लूक आणि फिचर्स या गाडीमध्ये दिले आहेत. ही गाडी अरुणाचल प्रदेशमधील तवांग येथे साजरा केला जाणाऱ्या टोरग्या फेस्टिवलमध्ये लाँच करण्यात आली. या गाडीला युनिक फ्युअल टँक आणि फेंडर देण्यात आला आहे. गाडीचा लोगो ही युनिक देण्यात आला आहे.
प्रमियम दुचाकी निर्मितीमध्ये जावा हे मोठे नाव आहे. 1960 पासून कंपनी दुचाकी निर्मिती करत आहे. भारतामध्ये या गाडीचे कल्ट फॉलोविंग आहे. म्हणजे या गाडीचा विशिष्ट चाहता वर्ग आहे. महिंद्रा कंपनीची उपकंपनी क्लासिक लेजंड या कंपनीने जावा ब्रँड विकत घेतला असून क्लासिक लेजंड कडून भारत आणि भारताबाहेर दुचाकीचे वितरण केले जाते.
या गाडीला 294.72cc, single-cylinder इंजिन देण्यात आले आहे. त्यातून 27 bhp आणि 26.84 Nm पिक टॉर्क तयार होतो. तसेच गाडीला हा गिअर देण्यात आले आहेत. अरुणाचल प्रदेशचे अप्रतिम सौंदर्य असून रस्तेही खूप वेगळे आहेत. येथील समृद्ध संस्कृतीला साजेशी गाडी बनवण्याचा प्रयत्न जावा ने केला असल्याचे कंपनीने सीईओ आशिष सिंग जोशी यांनी म्हटले.