Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Credit cards in India : क्रेडिट कार्डची थकबाकी 30 टक्क्यांनी वाढून पोचली विक्रमी पातळीवर

Credit cards in India

Credit cards in India: कोरोनानंतर ग्राहकांचा वाढता विश्वास आणि जलद डिजिटायझेशन यामुळे क्रेडिट कार्डची थकबाकी जानेवारी 2023 मध्ये 29.6 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर गेली.

कोरोनानंतर ग्राहकांचा वाढता विश्वास आणि जलद डिजिटायझेशन यामुळे क्रेडिट कार्डची थकबाकी जानेवारी 2023 मध्ये 29.6 टक्क्यांनी वाढून 1.87 लाख कोटींच्या विक्रमी पातळीवर गेली.

जूनमध्ये सर्वाधिक वाढ 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) म्हणण्यानुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यांत क्रेडिट कार्डची थकबाकी 20 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. जूनमध्ये सर्वाधिक वाढ 30.7 टक्के इतकी होती. एसबीआय कार्डचे एमडी-सीईओ रामा मोहन राव अमारा म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून क्रेडिट कार्डद्वारे खर्चात सातत्याने वाढ होत आहे. जानेवारीमध्ये क्रेडिट कार्डवरून 1.28 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आले, जे डिसेंबर 2022 मध्ये 1.26 लाख कोटी रुपये होते. ही वाढ वार्षिक आधारावर 45 टक्के आहे.

जानेवारी अखेरीस 8.25 कोटी क्रेडिट कार्ड जारी

जानेवारी अखेरीस 8.25 कोटी क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले आहेत. जानेवारी 2023 अखेरीस, विविध बँकांनी सुमारे 8.25 कोटी क्रेडिट कार्ड जारी केले होते. क्रेडिट कार्ड जारी करण्याच्या बाबतीत देशातील टॉप-5 बँका एचडीएफसी बँक, एसबीआय कार्ड, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक बँक आहेत. गेल्या 11 महिन्यांपासून क्रेडिट कार्डचा खर्च एक लाख कोटींहून अधिक राहिला आहे.

एक व्यक्ती जेव्हा क्रेडिट कार्डच्या भरवशावर खरेदी करते तेव्हा ती ज्या बँकेच्या क्रेडिट कार्डने पैसे देते, ते पैसे बँक स्वतः त्या विक्रेत्याला  देत असते. त्यानंतर बँककडून  त्या रकमेवर व्याज लावून ते पैसे त्या ग्राहकाकडून घेण्यात येत असतात. क्रेडीट कार्डचा वापर रोख रकमेचा व्यवहार करण्यासाठी करत नसून  ते ऑनलाईन व्यवहारांसाठी असतं. अगदीच निकड असल्यास क्रेडिट कार्डने कॅश काढता येते पण त्या क्षणापासून त्या रकमेवर आकार  सुरू होतो.

क्रेडीट कार्डचे फायदे आहेतच म्हणून लोक क्रेडीट कार्डचा वापर करत असतात. फक्त क्रेडिट कार्डचा वापर नीट आखणी करून करणे आवश्यक असते. वैद्यकीय किंवा इतर कोणती आर्थिक अडचण अचानकपणे आल्यास आणि  नेमके  तेव्हाच पैसे व्यक्तीच्या खात्यात नसताना त्याला क्रेडिट कार्डचा उपयोग करता येतो. जवळ पैसे नसताना क्रेडीट कार्डने बील चुकवता येतात, तसेच महत्वाची खरेदी करता येते. मासिक हप्ते सुरू करता आणि भरताही येतात.प्रत्येक बँकेच्या क्रेडिट कार्डवर काहिना काही ऑफर्स मिळत  असतात. कधी सहलीला जाताना हॉटेल बुक करायचे असल्यास इतर व्यक्तींना आणि कार्ड धारकाला मिळत असलेल्या ऑफरमध्ये  फरक जाणवतो. बहुतेकवेळा खाजगी बँकेच्या क्रेडीट कार्डवर हॉटेल्सच्या बुकिंगला, विमानाच्या सेवेला बरीच आर्थिक सूट देखील मिळते. यामुळे क्रेडीट कार्डचा वापर वाढत  आहे.

क्रेडीट कार्डच्या वापरामुळे व्यापारही  वाढतो. पर्यायाने अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळते. 2008-09 मध्ये आलेल्या भिषण मंदी नंतर क्रेडीट कार्डचा वापर ग्राहकांनी  वाढवावा यावर भर देण्यात आला. क्रेडिट आणि डेबिट कार्ड यांच्यातील प्रमुख फरक हा की डेबिट कार्ड हे बँकेतील खात्याशी जोडलेलं असून  जितके व्यक्तीच्या खात्यात पैसे तितके तो डेबिट कार्डने काढून खर्च करू शकतो. याउलट क्रेडिट कार्ड मात्र बँकेच्या खात्याशी जुळलेलं नसून  बँकेत पैसे असो वा नसो क्रेडिट कार्डने पेमेंट करता येऊ शकते.

प्रत्येक बँकेच्या पॉलिसीनुसार मासिक खर्च मर्यादा ठरलेली असते,  म्हणजे काही बँकेच्या क्रेडिट कार्डने महिन्याला तीस ते साठ हजार रुपयांची खरेदी करता येऊ शकते. बँकेच्या क्रेडीट कार्डने जो खर्च केला ती रक्कम बँकेला परत करण्याचीही बँकेनुसार वेगवेगळी धोरणे असतात. साधारणपणे पन्नास दिवसाच्या आत ही रकम भरावी लागते.क्रेडिट कार्ड हे ऑनलाइन अर्ज करून मागवता येतं, पण आजकाल बहुतेक प्रायव्हेट बँका ते स्वतःहून ऑफर करतात. कारण यातून त्यांनाही फायदा होत असतो. ग्राहकांनीही व्यवस्थित वापर केल्यास क्रेडिट कार्ड फायदेशीर ठरताना दिसते.