Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, सर्व डिटेल्स एका क्लिकवर...

Jana Small Finance Bank: जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येण्यास सज्ज, सर्व डिटेल्स एका क्लिकवर...

Jana Small Finance Bank: स्मॉल फायनान्स विभागातली एक महत्त्वाची बँक असलेल्या जन स्मॉल फायनान्स बँकेचा आयपीओ बाजारात येणार आहे. यानिमित्तानं गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा एकदा सकारात्मक वातावरण असणार आहे. नफा मिळवण्याची संधी यानिमित्तानं मिळणार आहे.

जन स्मॉल बँकेचा आयपीओ खरं तर दोन वर्षांपूर्वीच दाखल झाला असता. मात्र कोरोना काळातल्या अडचणी पाहता बँकेनं आयपीओची प्रक्रिया त्यावेळी थांबवली. आता बँकेनं भांडवली बाजार नियामक सेबीकडे आवश्यक ती कागदपत्रे म्हणजेच डीआरएचपी (Draft red herring prospectus) दाखल केला आहे. 575 कोटी रुपये या आयपीओद्वारे बँक उभारणार आहे. ताजे इक्विटी शेअर्स या आयपीओद्वारे जारी करण्यात येणार आहेत. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातूनदेखील शेअर विक्री करण्यात येणार आहेत. यात 40 लाखांपेक्षा जास्त शेअर्स विकण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

प्रवर्तक आणि शेअर्सची विक्री

बँकेनं आपला डीआरएचपी सेबीकडे सादर केला आहे. यानुसार, 

  • ओएफएसअंतर्गत 17,57,755 क्लायंट रोजहिल इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहे. 
  • सीव्हीसीआयजीपी II एम्प्लॉई रोजहिल 9,29,656 इक्विटी शेअर्सची विक्री करणार आहेत. 
  • ग्लोबल इम्पॅक्ट फंड्स, एससीए, एसआयसीएआर आणि सब फंड ग्लोबल फायनान्शियल इन्क्लूजन फंड यांच्या माध्यमातून 1,41,285 इक्विटी शेअर्स विकले जातील.
  • ग्रोथ पर्टनरशिप शिवशंकर को-इन्व्हेस्टमेंट ट्रस्टचे 1995  तर हिरो इंटरप्राइज पार्टनर व्हेंचर्सचे 1,220,000 इक्विटी शेअर्स विक्री करण्यासाठी असणार आहे.

जन स्मॉल फायनान्स बँकेविषयी...

बँकेनं आपल्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च 2020पर्यंत व्यवस्थापनाखालच्या तसंच ठेवींचं प्रमाण याचं गणित जुळवता देशातली एक अग्रगण्य बँक आहे. 2008पासून बँकेनं जवळपास 8.00 दशलक्ष ग्राहक जोडले आहेत. त्यातले 3.05 दशलक्ष ग्राहक तर सक्रीय आहेत.  28 फेब्रुवारी 2021पर्यंत बँकेच्या 611 शाखा होत्या. 19 राज्ये तसंच 3 केंद्रशासित  प्रदेशातल्या 229 जिल्ह्यांमध्ये 134 एटीएम आहेत. तर 31 मार्च 2023पर्यंत 22 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये 754 बँकिंग आउटलेट्स होती. आकडेवारीनुसार, 31 मार्च 2023पर्यंत बँकेचे जवळपास 4.57 दशलक्ष सक्रिय ग्राहक आहेत.