• 05 Feb, 2023 14:17

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jackie Shroff Help : जॅकी श्रॉफ लिटिल चॅम्प स्पर्धकाला देणार लॅपटॉप, सोबत एका वर्षासाठी इंटरनेट आणि वीज बिल भरणार

Jackie Shroff Help

Image Source : www.mobile.twitter.com

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Bollywood actor Jackie Shroff) हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. पण मागील काही दिवसांपासून जॅकी श्रॉफ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. त्यांनी एका सिंगींग रिअँलिटी शोमधील स्पर्धकाला मदत जाहीर केली आहे. तो स्पर्धक कोण आहे? आणि ही मदत का करत आहे? हे आपण पाहूया.

अभिनेता जॅकी श्रॉफ सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच जॅकी श्रॉफ (Bollywood actor Jackie Shroff) यांनी सिंगिंग रिअॅलिटी शो सा रे ग म प लिल चॅम्प्स ग्रँड फिनालेमध्ये पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. यादरम्यान स्पर्धक हर्ष सिकंदरचा (Harsh Sikander, Sa Re Ga Ma Pa Little Champ contestant) परफॉर्मन्स पाहून जॅकी भावूक झाले आणि त्याला मिठी मारली. एवढेच नाही तर यावेळी त्यांनी हर्ष सिकंदरला मदत घोषित केली.

हर्षला मिळणार मदत

सिंगिंग रिअॅलिटी शो सा रे ग म प लिल चॅम्प्सचा काही दिवसांपूर्वीच फिनाले पार पडला. यावेळी अभिनेता जॅकी श्रॉफ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शोमधील स्पर्धक हर्ष सिकंदरच्या गोड गळ्याने जॅकी श्रॉफला भूरळ घातली. त्याचे टॅलेंट पाहून तसेच हर्षच्या कुटुंबाच्या आर्थिक संकटाबद्दल कळल्यानंतर, जॅकी श्रॉफ यांनी हर्षला मदत जाहीर केली. जॅकी यांनी हर्षला लॅपटॉप देण्याचे वचन देत एक वर्षासाठी इंटरनेट आणि वीज बिल भरणार असल्याचे सांगितले.

वडिलांच्या निधनानंतर हर्षने केला कुटुंबाचा सांभाळ

9 वर्षीय फायनलिस्ट हर्ष सिकंदरचे वडील या जगात नाहीत. त्यांच्या मृत्यूनंतर, हर्ष हाच त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता आहे. हर्ष जागृतांमध्ये भक्तिगीते गातो आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो. हे ऐकून जॅकी श्रॉफ भावूक झाला. त्यावेळी 'मी तुम्हाला ऑनलाइन क्लासेससाठी लॅपटॉप देईन, जेणेकरून तुम्ही घरबसल्या शिकून अभ्यास करू शकाल.' असे जॅकी श्रॉफ म्हणाले.

जॅकी श्रॉफ यांनी केले कौतुक

शो दरम्यान जॅकी म्हणाला की, “तुझा आवाज इतका शुद्ध आहे की तो प्रत्येकाच्या हृदयाला भिडतो. तुम्ही ते अधिक चांगले बनवण्यावर लक्ष केंद्रित करावे आणि तुमची प्रतिभा आणखी वाढवावी अशी माझी इच्छा आहे.” जॅकी पुढे म्हणाले की, “म्हणूनच मी तुला एका वर्षासाठी तुझे इंटरनेट आणि वीज बिल देईन' मला आशा आहे की तू तुझ्या टॅलेंटने एक दिवस मोठे यश मिळवशील.”