• 28 Nov, 2022 18:21

ITR Filling : 2022-23 साठी आयटीआर भरण्याची मुदत वाढली!

Income Tax Return File

ITR Filling : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी (दि.26 ऑक्टोबर) मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी कंपन्यांकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. इन्कम टॅक्स कायद्यानुसार टॅक्स पेअर्सना आयटीआर (Income Tax Return-ITR) भरणे बंधनकारक आहे.

Income Tax Return Filing Due Date : केंद्रीय अर्थ मंत्रालयाने 2022-23 या मूल्यांकन वर्षासाठी (Assessment Year) कंपन्यांद्वारे इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवली. यापूर्वी ती 31 ऑक्टोबर होती. त्यात वाढ करून अर्थमंत्रालयाने करदात्यांना दिलासा दिला आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने बुधवारी (दि.26 ऑक्टोबर) मूल्यांकन वर्ष 2022-23 साठी कंपन्यांकडून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 7 नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली. इन्कम टॅक्स कायद्यानुसार टॅक्स पेअर्सना आयटीआर (Income Tax Return-ITR) भरणे बंधनकारक आहे. याची यापूर्वी अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2022 होती. ज्या कंपन्यांना त्यांच्या खात्याचे ऑडिट करणे गरजेचे आहे. त्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत आयटीआर भरणं बंधनकारक होतं. त्यात आता 7 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली.

सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (Central Board of Direct Tax - CBDT) या संस्थेने एक परिपत्रक प्रसिद्ध करत आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आल्याची घोषणा केली. सीबीडीटीने आयटीआर रिटर्न भरण्याची वाढवलेली अंतिम तारीख ही ज्यांना ऑडिट करणे गरजेचे आहे, त्या सर्वांना लागू आहे, अशी माहिती टॅक्सबडी.कॉमचे संस्थापक सुजित बांगर (Sujit Bangar, Founder, Taxbuddy.com) यांनी दिली. वैयक्तिक करदात्यांनी आयटीआर भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 होती.  

इन्कम टॅक्स ऑडिट रिपोर्ट म्हणजे काय?

इन्कम टॅक्स कायदा, 1961 नुसार, ज्यांचा स्वत: व्यवसाय आहे किंवा सेल्फ एम्प्लॉईड आहेत. अशा लोकांना संपूर्ण आर्थिक वर्षातील जमा-खर्चाचा हिशोब सीएकडून ऑडिट करून आयटीआर फाईल करून सरकारकडे जमा करावा लागतो. बहुतांश कंपन्यांचे ऑडिट क्वॉलिफाईड चार्टर्ड अकाऊंटंटकडून केलं जातं. ते कंपनीच्या खरेदी-विक्रीची बिलं, जमा-खर्च आणि कंपनीच्या आर्थिक गोष्टींचा लेखाजोखा तपासून त्यातील त्रुटी दूर करून कंपनीला पुन्हा सबमिट केल्या जातात. त्याला सोप्या भाषेत ऑडिट म्हणतात. सीएने ऑडिट रिपोर्ट दिल्यानंतर संबंधित कंपनी आयटीआर फाईल करू शकते.