आयटीसी (Imperial Tobacco Company of India Limited) ही मूळ सिगारेट कंपनी असली तरी आता विविध क्षेत्रात कंपनीनं आपला विस्तार केलाय. हॉटेल व्यवसाय ते फूड बिसनेस अशा विविध स्तरावर कंपनीनं आपला व्यवसाय वाढवला. त्यामुळेच की काय कंपनीचं मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे गेलंय. कंपनीची अशाप्रकारची ही पहिलीच कामगिरी आहे. टीसीएस (TCS), रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance), इन्फोसिस (Infosys), हिंदुस्थान युनिलिव्हर (Hindustan Unilever), एचडीएफसी (HDFC) या आयटीसीच्या पुढे आहेत. एवढी मोठी झेप आयटीसीनं कशी घेतली, याचाही आढावा घेऊया...
Table of contents [Show]
एलिट ग्रुपमध्ये एंट्री
मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे गेलेल्या कंपन्यांचा समावेश एलिट ग्रुपमध्ये होत असतो. या ग्रुपमध्ये आयटीसीचा समावेश झाला आहे. देशात सध्या केवळ 8 कंपन्या आहेत ज्यांचं मार्केट कॅप 5 लाख कोटींच्या पुढे आहे. यात रिलायन्स ग्रुप, टाटा, इन्फोसिससारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. आता यात आयटीसीची भर पडलीय. गुरुवारी आयटीसीच्या शेअरमध्ये एक टक्क्यांहून जास्त वाढ झाली. कंपनीच्या शेअरनं 402.60 रुपयांची विक्रमी पातळी गाठली. आयटीसीच्या मार्केट कॅपने पहिल्यांदाच 5 लाख कोटी रुपयांची पातळी गाठली.
21 टक्के वाढ
बीएसईच्या डेटानुसार, मार्केट कॅप रँकिंगमध्ये आयटीसी 8व्या स्थानावर आहे. 5.003 ट्रिलियन इतकं मार्केट कॅप कंपनीचं आहे. दुसरीकडे, बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 0.37 टक्क्यांच्या वाढीसह 59,790.16वर व्यवहार करताना दिसून आला. कॅलेंडर वर्ष 2023मध्ये आयटीसीच्या शेअर्समध्ये 21 टक्क्यांनी वाढ झाली. तर सेन्सेक्स 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरला.
कंपनीच्या कामगिरीत लवचिकता
इम्पेरियल टोबॅको कंपनी ही केवळ तंबाखूच नाही तर विविध क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. सिगारेट्ससह फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स, हॉटेल्स आणि पेपर अशा व्यवसायांमध्ये अग्रेसर आहे. मागणीतली अनिश्चितता, चलनवाढीचा मार्जिनवर सततचा दबाव असं असतानादेखील आयटीसीनं चांगली कामगिरी केली. मागच्या काही तिमाहींमध्ये कंपनीच्या कामगिरीत लवचिकता दिसून आली.
परदेशी गुंतवणूकदारांचा हिस्सा वाढला
परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनीही (FPIs) आयटीसीवर विश्वास दाखवला. सलग तिसऱ्या तिमाहीत आयटीसीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली. मार्च 2023मध्ये त्यांची हिस्सेदारी 12.51 टक्क्यांनी वाढत 12.87 टक्क्यांपर्यंत पोहोचली. ही डिसेंबर 2022च्या तिमाहीच्या शेवटी नोंद केली होती. शेअरहोल्डिंग पॅटर्न डेटानुसार सप्टेंबर 2022च्या तिमाहीत त्यांच्याकडे 12.25 टक्के हिस्सा होता. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी आपलं भागभांडवल वाढवल्यामुळे कंपनीचं मूल्य अधिक वाढण्यास मदत होतेय.