Tata Elxsi, Trent stocks midcap stocks upgraded to largecap: टाटा समुहाच्या (Tata Group) टाटा एल्क्सी (Tata Elxsi) आणि ट्रेंट (Trent) यांनी मिड कॅप ते लार्ज कॅप श्रेणीत प्रवेश केला आहे. एलक्सी ही एक डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ऑटोमोटिव्ह, ब्रॉडकास्ट, कम्युनिकेशन्स, हेल्थकेअर आणि वाहतूक क्षेत्रांमध्ये ही कंपनी सेवा देते. दुसरीकडे, ट्रेंट ही टाटा समूहाची रिटेल कंपनी आहे. गेल्या वर्षी या कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती, ज्यामुळे ते लार्ज कॅप श्रेणीपर्यंत पोहोचू शकले. भारतातील म्युच्युअल फंडच्या संघटनेने (AMFI: Association of Mutual Funds in India) लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. कंपन्यांच्या सहा महिन्यांच्या सरासरी मार्केट कॅपच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे.
टाटा एल्क्सीचे (Tata Elxsi) शेअर्स गुरुवारी 6 हजार 220.55 रुपयांवर बंद झाले होते. या किंमतीनुसार, त्याचे मार्केट कॅपिटल 38 हजार 773.31 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी 17 ऑगस्ट रोजी 10 हजार 760.40 होते. हा तब्बल 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. त्याचा 52 आठवड्यांचा नीचांक 5 हजार 708.10 रुपये आहे. गेल्या वर्षी 26 डिसेंबरला ते या पातळीवर घसरले होते. दुसरीकडे, ट्रेंटचा शेअर गुरुवारी 1 हजार 265.95 रुपयांवर बंद झाला. या किंमतीनुसार, त्याचे मार्केट कॅप 45 हजार 111.36 कोटी रुपये आहे. त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1 हजार 571.00 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 983.70 रुपये आहे.
कोणत्या कंपन्यानी मिड कॅपमध्ये प्रवेश केला? (Which companies entered mid cap?)-
मिड-कॅप ते लार्ज-कॅप श्रेणीमध्ये प्रवेश केलेल्या कंपन्यांमध्ये टाटा एलक्सी आणि ट्रेंट याशिवाय एबीबी इंडिया (ABB India), वरुण बेव्हरेजेस (Varun Beverages), पेज इंडस्ट्रीज (Page Industries), बॉश (Bosch) आणि पीआय इंडस्ट्रीज (PI Industries) यांचा समावेश आहे. मुथूट फायनान्स (Muthoot Finance), पेटीएमची (Paytm) मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन (One 97 Communications), बंधन बँक (Bandhan Bank), एमफेसिस (Mphasis), ग्लँड फार्मा (Gland Pharma) आणि पिरामल (Piramal) आदी कंपन्यांनीदेखील मिड कॅपमधून लार्ज कॅपमध्ये प्रवेश केला आहे.
टिमकेन इंडिया, मेट्रो ब्रँड्स, ब्लू डार्ट, फाइन ऑरगॅनिक्स इंडस्ट्रीज, यूको बँक, जेएफ कमर्शियल व्हेइकल्स आदी कंपन्या स्मॉलवरुन मिड-कॅप्सपर्यंत वाढल्या आहेत. डएफ कमर्शियल व्हेईकल कंट्रोल सिस्टम्स, अपोलो टायर्स आणि केपीआयटी टेक्नॉलॉजीज. मिडकॅप्सवरून स्मॉलकॅप्समध्ये आलेल्या कंपन्यांमध्ये, तान्ला प्लॅटफॉर्म, आयईएक्स, गोदरेज इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय सिक्युरिटीज आणि आवास फायनान्सर्स यांचा समावेश आहे. लार्ज कॅप्ससाठी 48 हजार 900 कोटी रुपये आणि मिड कॅप्ससाठी 16 हजार 800 कोटी रुपये कट ऑफ आहे.