Shaniwar Wada, Pune: 10 जानेवारी 1730 रोजी शनिवार वाडयाचे भूमिपूजन झाले होते. त्यानंतर त्याचे बांधकाम करण्यास सुरूवात झाली होती. हा दिवस शनिवार होता म्हणून या वाडयाचे नाव ‘शनिवार वाडा’ असे ठेवण्यात आले आहे. पुणेकरांचा अभिमान शनिवार वाडा आहे. पुणे म्हटले की, पहिले शनिवार वाडा हेच नाव येते. विशेष म्हणजे बाजीराव-मस्तानी (Bajirao Mastani ) सारखा चित्रपटदेखील या वाडयावर आधारित होता. या वाडयाचा इतिहास जाणून घेवुयात.
शनिवार वाडा बांधताना किती खर्च आला (How much did it Cost to Build Shaniwar Wada)
10 जानेवारी 1730 रोजी शनिवार वाडा बांधण्यास सुरूवात झाली होती. यानंतर त्याच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम हे 22 जानेवारी 1732 रोजी पूर्ण झाले. याच दिवशी या वाडयाची वास्तुशांती देखील करण्यात आली होती. या वास्तुशांतीचा खर्च 233 रूपये आठ आणे इतका आला होता. सुमारे 300 वैदिकांनी वास्तुशांती पार पाडली. हा वाडा उभा करण्यासाठी त्याकाळी साधारण 16,110 रूपये इतका खर्च आला होता. हा वाडा बांधताना सुरक्षिततेला अधिक प्राधान्य देण्यात आले होते. पेशव्यांचे मुख्य ठिकाण असलेला शनिवार वाडा हा सध्या पुण्याच्या संस्कृतीचे प्रतिक मानले जाते.
कशा पध्दतीने बांधण्यात आला
शनिवार वाडा कशा पध्दतीने बांधला
शनिवार वाड्याची इमारत ही 21 फूट उंच होती, तर 950 फूट लांबीची तटबंदी भिंत ही तिच्या चारही बाजूने होती. या वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे व 9 बुरुज आहेत. तसेच तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांची नावे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा अशी आहेत. सर्व दरवाजे हे लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून तयार करण्यात आले होते. यात दरवाज्याची उंची ही 21 फूट असून रुंदी 14 फूट आहे. हा शनिवार वाडयाचा सर्वांत मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून 275 शिपाई असायच, तर रात्रंदिवस 500 स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी 1000 हून अधिक पहारेकरी होते. या वाडयात गणेश महल, रंग महल, आरसा महल, हस्तीदंत महल, दिवाणखाना आणि कारंजे पाहायला आहेत. तर पुण्याचे आकर्षण असणारा शनिवार वाडयासमोर पहिल्या बाजीरावाचा घोडयावर बसलेला पुतळा आहे. या महालात एकाच वेळी 1000 लोक राहण्याची व्यवस्था होती.
शनिवार वाडयाला आग लागली तेव्हा...
27 फेब्रुवारी 1828 ला शनिवार वाडयाला आग लागली होती. विशेष म्हणजे ही आग विझवण्याकरता त्यावेळी तब्बल 7 दिवस लागले होते. पण ही आग कशी लागली हे आज देखील एक गुढ आणि रहस्यच राहिले आहे.