“It is Impossible to get Something for nothing” अर्थात “FREE”, ‘विनामोबदला”, “मोफत”, “शून्य किंमत” जरी असे म्हटले जात असले तरी बाजारात येणारी प्रत्येक गोष्ट ही अदृश्य प्राईस-टॅग लावूनच येते. तीच गोष्ट “इन्शुरन्स प्रॉडक्ट”ची देखील. प्रत्येक इन्शुरन्स प्रॉडक्टसाठी खर्च हा येतोच, मग ती कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी किंवा प्लॅन असो. प्युअर टर्म इन्शुरन्स किंवा TROP म्हणजे रिटर्न ऑफ प्रीमियम टर्म प्लॅन असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा प्लॅन असो. मुळात ही तुलना, चर्चा सुरु होते ती “BFSI” अर्थात बँकिंग-फायनान्शिअल सर्विसेस-इन्शुरन्स मार्केट-मध्ये सर्वाधिक चर्चिल्या जात असलेल्या “झिरो-कॉस्ट टर्म प्लॅन”च्या आगमनामुळे आणि “झिरो कॉस्ट” प्लॅन असे जरी म्हटले जात असले, तरी देखील “शून्य-किंमत” ही संकल्पना प्रॅक्टिकली शक्य नाही.
झिरो कॉस्ट इन्शुरन्स प्लॅन्स महाग असतात का?
"झिरो कॉस्ट टर्म प्लॅन" किंवा "शून्य-किमतीचा मुदतीचा विमा" योजनेत, पॉलिसीधारकाचा पॉलिसी-टर्मच्या दरम्यान मृत्यू झाल्यास, रेग्युलर (प्यूअर) टर्म प्लॅनच्या बेसिक बेनिफिट-प्रमाणे नॉमिनीला “डेथ-क्लेम”ची अमाऊंट तर दिली जाते. एवढेच नाही तर, पॉलिसी मॅच्युअर्ड झाल्यास, TROP (रिटर्न ऑफ प्रीमियम - टर्म प्लॅन) प्रकारच्या टर्म प्लॅनच्या विशेष बेनिफिट्स-प्रमाणे पॉलिसीधारकाने सर्व प्रीमियमस् नियमितपणे भरले असतील, तर भरलेले सर्व प्रीमियमस् (GST वगळता) परत केले जातात. मात्र याचसोबत, या प्लॅनचा USP म्हणजे पॉलिसीधारकाला विशिष्ट वयात पॉलिसी-करारामधून बाहेर पडण्याचा पर्याय देखील एन्जॉय करता येतो. TROP प्लॅन्स-प्रमाणे, पॉलिसी-टर्म पूर्ण होण्याची वाट पहावी लागत नाही.
हे सर्व जरी असले, तरी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे झिरो कॉस्ट टर्म प्लॅनसाठीची प्रीमियमची अमाऊंट ही TROP प्लॅन्सच्या तुलनेमध्ये खूप किफायतशीर जरी असली, तरी देखील रेग्युलर टर्म प्लॅनसाठीच्या प्रीमियमच्या रक्कमेच्या तुलनेमध्ये जास्त असू शकते. म्हणजेच, झिरो कॉस्ट इन्शुरन्स प्लॅन्स ट्रॅडिशनल टर्म प्लॅन्सच्या तुलनेत 25-35 टक्के महाग असतात.
“रेग्युलर टर्म इन्शुरन्स प्लॅन”सोबत “झिरो-कॉस्ट टर्म प्लॅन”ची तुलना करावयाची झालीच तर एक उदाहरण घेऊयात.
समजा एका 30 वर्षांच्या प्रौढ व्यक्तीने 30 वर्षांच्या पॉलिसी टर्म साठी 1 कोटी रुपयांची रेग्युलर टर्म पॉलिसी घ्यायची ठरवली, तर त्याला साधारणपणे 10,000-12,000 रुपये/प्रतिवर्ष इतका प्रीमियम भरावा लागू शकतो. दुसरीकडे, तेवढ्याच पॉलिसी टर्मसाठी झिरो-कॉस्ट टर्म इन्शुरन्सची किंमत साधारणपणे 15,000 रुपये प्रतिवर्ष असू शकते. त्यामुळे, जर त्याने झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्सची खरेदी केली, तर त्याला 30 ते 40 वर्षांपर्यंत दरवर्षी सुमारे 3,000 रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील.
रेग्युलर टर्म प्लॅन त्या पॉलिसीधारकाने वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत चालू ठेवल्यास त्याने एकूण 3,00,000 ते 3,60,000 रुपये प्रीमियमच्या स्वरूपात इन्शुररकडे जमा केले असतील. मात्र त्याने रेग्युलर टर्म प्लॅनऐवजी "झिरो-कॉस्ट टर्म" प्लॅन घेतला असेल, तर त्याने इन्शुररकडे 4,50,000 रुपये (रु. 15,000 x 30 वर्षे) जमा केलेले असतील. आणि 30 वर्षांनंतर तो प्लॅनमधून बाहेर पडला, तर इन्शुरन्स कंपनी त्याला सुमारे (4,50,000 - GST चार्जेस) इतकी रक्कम परत करु शकेल.
झिरो-कॉस्ट टर्म प्लॅनला पर्याय काय?
पॉलिसीधारकाने झिरो-कॉस्ट टर्म प्लॅन घेण्याऐवजी, जर त्याने रेग्युलर टर्म कव्हर खरेदी केले आणि अतिरिक्त भरले जात असलेले 3,000 रुपये इतका प्रीमिअम इक्विटी, म्युच्युअल फंड, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवले, तर त्याला दरवर्षी 10 टक्के व्याज दराने परतावा मिळू शकतो. त्याला साधारणपणे 30 वर्षांनंतर एक कॉर्पस तयार करता येईल, जो त्याला बाहेर पडताना "रिटर्न ऑफ प्रीमियम" म्हणून मिळणाऱ्या रकमेइतका किंवा त्याहून अधिकच असेल. म्हणजेच, रेग्युलर टर्म प्लॅनमध्ये पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर कोणतेही प्रीमियम परत केले जात नाही. मात्र त्याच लाईफ कव्हरसाठी प्रीमियम भरावा लागतो, तो खूपच कमी असतो. आणि डेथ-बेनिफिट्स मात्र दोन्ही प्लॅन्स मध्ये सारखेच असतात.
आर्थिक सुरक्षितता (Financial Literacy) हा पर्याय प्राधान्यक्रमावर असेल, तर प्युअर टर्म प्लॅनच खरेदी करणे, केव्हाही सर्वोत्तम कल्पना असेल. लॉंग टर्मसाठी अतिरिक्त प्रीमियम भरून कमी रक्कम परत मिळविण्यापेक्षा अधिकचे पैसे गुंतवून जास्तीचे रिटर्न्स मिळविणे, केव्हाही फायद्याचे. शेवटी सांगायचे झालेच तर, इन्शुरन्स कंपन्या कस्टमर्सना "प्रीमियम परत करीत" असल्या तरीदेखील, 20-25-30 वर्षांच्या दीर्घकालीन पॉलिसीजच्या अतिरिक्त प्रीमियमवर कंपन्यांनी मिळविलेले कोणतेही व्याज कस्टमर्स गमावतात आणि हीच ती या प्रकारच्या टर्म प्लॅन्स-अंतर्गत भरली जाणार असलेली "झिरो कॉस्ट" किंवा "शून्य किंमत" असते.