भारतात कडक उन्हाळ्याचे दिवस येणार आहेत. अशावेळी एसीचा (AC) वापर सुरू होईल. एसीच्या वापरामुळे वीज बिलही जास्त येऊ लागते. त्यामुळे नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत वीज वाचवण्यासाठी काही टिप्स जाणून घेणे गरजेचे आहे. आज आपण त्या पद्धतींबद्दल माहिती मिळवूया ज्यामुळे तुम्हाला वीज बचत करण्यात मदत होईल.
कमी वीजबिलासाठी ऑटो कुलिंग मोड निवडा
एसीची गारेगार हवा तर हवी. पण त्यासोबतच वीजबिल सुद्धा कमी यावे. अशी सर्वांची इच्छा असते. त्यासाठी एक उपाय करता येईल. तो म्हणजे एसी ऑटो कुलिंग मोडवर ठेवा. त्याचबरोबर काही वेळासाठी म्हणजे 20 मिनिटांपर्यंत तुम्ही एसी क्विक कूल मोडवर ठेवला तरी चालेल. यामुळे काय होते तर तुमची खोली लवकर थंड होते. खोली थंड झाल्यानंतर तापमान पुन्हा 24 अंशावर सेट करा. 24 अंश हे मानवी शरीरासाठी योग्य तापमान आहे. तापमानात वाढ झाल्यानंतर गारवा मिळावा म्हणून अनेक जण एसीचे तापमान 18 डिग्री सेल्सिअसवर सेट करतात. रुम कुलिंगसाठी वापरण्यात येणारी ही पद्धत चुकीची आहे. याबाबत ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीचे म्हणणे आहे की, एसीचे सरासरी तापमान 24 डिग्री सेल्सिअस असले पाहिजे आहे. कारण हे तापमान मानवी शरीरासाठी योग्य आणि आरामदायक आहे. शिवाय एका संशोधानातून समोर आले आहे की, एसीच्या वाढलेल्या प्रत्येक डिग्री तापमानामुळे जवळपास 6 टक्के वीज वाचते.
एसी लावण्याआधी खिडक्या दरवाजे उघडा
एसीद्वारा कमी वेळात रुम थंड करण्यासाठी रुम वेंटिलेटेड होणे गरजेचे आहे. त्यासाठी एसी लावण्याआधी रुमच्या खिडक्या-दरवाजे खुली करावी आणि पंखा लावावा. यामुळे रुम वेंटिलेटेड होतं. त्याचप्रमाणे रुम कुलिंग होण्यास जास्त वेळ लागत नाही. आणि त्यामुळे एसी कमी वेळात रुम थंड करतो. हो पण जेव्हा तुम्ही एसी चालू कराल. सर्व खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण, तरच तुम्हाला जलद थंडावा मिळेल आणि खोली लवकर थंड होईल. त्यामुळे विजेचीही बचत होणार आहे.
सर्व्हिसिंग आवश्यक आहे
सर्व उपकरणांना सर्व्हिसिंग आवश्यक असते. एसी हे सुद्धा एक यंत्र आहे. भारतात, विशेषत: घरांमध्ये वर्षभर एसी वापरला जात नाही आणि त्यात धूळ साचते, ज्यामुळे मशीनला समस्या निर्माण होतात. या प्रकरणात ते अधिक वीज वापरली जावू शकते. तुमच्या घरात येणाऱ्या धुळीचे प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही वर्षातून 2 ते 3 वेळा एसी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. यामुळे कुलिंगही चांगले होते शिवाय विजेचीसुद्धा बचत होते.
News Source : Tips For Energy Saving: 'या' 4 टिप्स फॉलो करा, AC वापरूनही कंट्रोलमध्ये येईल वीज बिल! (india.com)