Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Kisan Vikas Patra : किसान विकास पत्राच्या मॅच्युरिटीवर टॅक्स द्यावे लागते का ?

Kisan Vikas Patra

Kisan Vikas Patra Yojana : किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिसद्वारे राबवली जाणारी सुरक्षित बचत योजना आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली व्यक्ती किसान विकास पत्रात गुंतवणूक करु शकते. या योजनेचा व्याजदर 7.2% आहे. KVP वर मिळालेल्या व्याजावर TDS कापला जात नाही. यामुळे मिळालेले व्याज आयटीआरमध्ये दाखवावे लागते.

Tax Payable On Maturity Of KVP : किसान विकास पत्र योजना ( Kisan Vikas Patra Yojana 2023) ही गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट करणारी योजना आहे. ही योजना निश्चित कालावधीसाठी गुंतवणूक केलेले आपले पैसे दुप्पट करण्याची हमी देते. हमखास लाभाची शाश्वती देणारी, कमीत कमी जोखीम असे स्वरुप असलेली आणि बाजारातील चढ- उतारांचा कोणताही परिणाम स्वत:वर होऊ न देणारी, असे या योजनेचे वैशिष्ट्ये आहे. या योजनेत मॅच्युरिटीच्या वेळी गुंतवणूकदाराला दुप्पट रिटर्न्स मिळते.

प्रतिवर्ष व्याजदर 7.2 टक्के

किसान विकास पत्र योजना असे नाव असले तरी, ही योजना केवळ शेतकऱ्यांपुरतीच मर्यादित नाही. तर सामान्य गुंतवणूकदार देखील यात पैसे गुंतवू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला सर्टिफिकेट दिल्या जाते. केंद्र सरकारने प्रतिवर्ष व्याजदर 7.2 टक्के वाढविले आहे.

120 महिन्यांच्या कालावधीतच दुप्पट

आता किसान विकास पत्रामध्ये केलेली गुंतवणूक 120 महिन्यांच्या कालावधीतच दुप्पट होणार आहे. या योजनेत प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्याजाची रक्कम गुंतवणूकदाराच्या खात्यात जोडली जाते आणि चक्रवाढ व्याजानुसार रक्कम वाढतच जाते. यामध्ये 1000 रुपयांपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात करुन, कितीही रक्कम गुंतवणूक करता येते.

अगदी सोपी फॉरमॅलिटी

किसान विकास पत्र खरेदीसाठी KYC आयडी प्रूफ द्यावे लागते. जसे की, आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्राइविंग लायसन्स, पासपोर्ट. त्यानंतर पोस्टाकडे किसान विकास पत्र काढण्यास अर्ज करावा लागतो. रहिवासाचा पुरावा द्यावा लागतो. आणि जन्माचा दाखला द्यावा लागतो.

TDS कापला जात नाही

अनेक वेळा गुंतवणूकदार किसान विकास पत्रावर मिळालेले व्याज त्यांच्या करपात्र उत्पन्नामध्ये समाविष्ट करतात. मात्र KVP वर मिळालेल्या व्याजावर TDS कापला जात नाही. यामुळे मिळालेले व्याज आयटीआरमध्ये दाखवावे लागते. कलम 194A च्या तरतुदींनुसार KVP च्या मॅच्युरिटीनंतर मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावर कोणताही कर कापण्याची आवश्यक्ता नाही. आणि जर का गुंतवणूकदाराने कर सेल्फ-असेसमेंट किंवा अॅडव्हान्स टॅक्सच्या स्वरुपात भरला असेल, तर मॅच्युरिटीवर कोणताही कर भरावा लागणार नाही.