Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Coromandel express Accident: ओडिशातल्या रेल्वे अपघातावर आयआरडीएआयनं जारी केला सुमोटो, क्लेम किती?

Coromandel express Accident: ओडिशातल्या रेल्वे अपघातावर आयआरडीएआयनं जारी केला सुमोटो, क्लेम किती?

Coromandel express Accident : ओडिशात मोठा रेल्वे अपघात घडला. जवळपास 288 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या कुटुंबीयांसाठी आयआरडीएआयनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांसाठी विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ केली आहे.

कोरोमंडल एक्स्प्रेसचा अपघात घडला. या दुर्दैवी घटनेत 288 प्रवाशांच्या मृताचा आकडा समोर आलाय. देशातला हा दुसरा सर्वात मोठा अपघात असल्याचं सांगण्यात येतंय. आयआरडीएआयनं (Insurance Regulatory and Development Authority) या कोरोमंडल ट्रेन अपघातातल्या पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतलाय. अपघातातल्या मृतांच्या नातेवाईकांसाठी विमा दाव्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. विमा कंपन्यांनी ओडिशा रेल्वे अपघातातल्या बळींचे दावे लवकरात लवकर पूर्ण करावेत, असं विमा नियामक मंडळानं म्हटलं आहे. टीव्ही 9नं याविषयी वृत्त दिलंय. दरम्यान, अपघाताची तीव्रता प्रचंड मोठी आहे. विम्याच्या माध्यमातून मदत वेगात दिल्याचं म्हटलं असलं तरी मृत प्रवाशांच्या कुटुंबीयांसाठी तसंच जखमी प्रवाशांसाठी ही आयुष्यभराची मोठी जखम झालीय, जी कधीच भरून निघणारी नाही.

जिल्हा प्रशासन किंवा रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन

जिल्हा प्रशासन किंवा रेल्वे अधिकाऱ्यांशी सर्व विमा कंपन्यांनी संपर्क साधावा, असं आयआरडीएआयनं सुमोटो जारी केला आहे. त्यांच्याकडून त्या लोकांची यादी घ्यावी, ज्यांचे रेल्वे अपघातात प्राण गेले किंवा ते जखमी झाले. यानंतर कंपन्यांनी स्वतः विमा दावा प्रक्रिया सुरू करावी. शक्य तितक्या लवकर दावे निकाली काढावे जेणेकरून पीडित कुटुंबांना तत्काळ मदत मिळू शकेल.

औपचारिकतेची गरज नाही

मिळालेल्या माहितीनुसार, विम्याचा दावा करण्यासाठी पीडित किंवा त्यांच्या नातेवाईकांना कोणताही फॉर्म भरण्याची गरज भासणार नाही. दावा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही औपचारिकता करण्याची आवश्यकता नाही. विमा कंपन्या स्वतः पीडितांना शोधून त्यांचे दावे पूर्ण करतील, असं सांगण्यात आलंय. 1 ते 10 लाखांपर्यंतचे दावे निकाली काढण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आधीही आली होती सुओ मोटोची प्रकरणं

मोठमोठ्या संकटकाळात त्वरीत मदत मिळणं गरजेचं आहे. अशावेळी सुओ मोटोची प्रक्रिया होते. हिमाचल प्रदेशात पूर आला होता, तेव्हा आयआरडीएआयनं असा निर्देश जारी केला होता. त्याचबरोबर मुंबई बॉम्बस्फोटातल्या पीडितांना त्याचप्रमाणं त्यातल्या मृतांच्या नातेवाईकांना तातडीनं मदत मिळावी, यासाठी असा नियम आणण्यात आला होता. आता रेल्वेच्या इतिहासातला दुसरा सर्वात मोठा अपघात ओडिशामध्ये घडलाय. यात अक्षरश: मृतांचा खच पाहायला मिळाला.

सुओ मोटो म्हणजे काय?

सुओ मोटो म्हणजे स्वत:हून निर्णय घेणं होय. हा एक लॅटिन शब्द आहे. स्वत:हून काहीतरी करणं म्हणजे एखाद्या घटनेत कोर्टाच्या निर्णयाची वाट न पाहणे असा त्याचा सरळ अर्थ होतो. समजा एखादी सरकारी एजन्सी, संस्था असेल, तिनं स्वत:हून निर्णय घेणं. कोर्टानं निर्णय देण्याएवढी वाट न पाहणं होय. मोठमोठ्या दुर्घटनांमध्ये जिथं विम्याची रक्कम त्वरीत पीडितांना मिळणं गरजेचं असतं, अशावेळी या सुओ मोटोचा वापर केला जातो. आताही आयआरडीएआयनं सुओ मोटो जारी केलाय. ओडिशा रेल्वे दुर्घटनेल्या पीडितांच्या विम्याचे दावे तत्काळ निकाली काढण्यासाठी सुओ मोटो जारी करण्यात आलाय.